आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यटनावर दहशत भारी:कलम 370 हटल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांची संख्या घटली, खोऱ्यात सर्वाधिक परिणाम; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीरपेक्षा लडाखमध्ये जास्त पर्यटक पोहोचले, 2015 मध्ये काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक पोहोचले होते

जम्मू-काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा (कलम 370) हटवल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत ही माहिती दिली. मात्र पर्यटन व हस्तकलेच्या क्षेत्रात गमावलेल्या नोकर्‍यांबाबत सरकारने कोणतीही माहिती दिली नाही.

काश्मीरपेक्षा लडाख येथे जास्त पर्यटक पोहोचले

ऑगस्ट 2019 पासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरच्या आकडेवारी वेगळे करून पाहिले तर काश्मिरमध्ये 84 हजार 326 तर जम्मूमध्ये 87 लाख 94 हजार 837 पर्यटक आले. लडाखमध्ये 1,00,931 पर्यटक पोहोचले. या काळात जम्मू येथे धार्मिक यात्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या 76,80,775 होती.

राजकीय वातावरणाचाही परिणाम

जम्मू-काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर येथील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना केंद्र सरकारने नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर DDC निवडणुकांत दहशतवाद्यांच्या भीतीमुळे वातावरण तापलेले राहिले. हे लक्षात घेता खोऱ्यात सैन्याची तैनाती आणखी वाढवली होती. अशा परिस्थितीत येथे पर्यटकांचे येणे कमी झाले.

2019 मध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला

5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार्‍या संविधानातील कलम 370 रद्द केले. यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश बनवण्यात केले. लडाखला देखील केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

2015 मध्ये काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक पोहोचले

इंडियास्पेंडच्या अहवालानुसार 2018 मध्ये ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान 3,16,434 पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. 2019 मध्ये ही संख्या 86% ने घसरून 43,059 वर गेली. जुलै 2019 मध्ये 152,525 पर्यटक काश्मीरमध्ये पोहोचले. ऑगस्टमध्ये केवळ 10,130 पर्यटक आले. सप्टेंबरमध्ये ही संख्या 4,562 वर घसरली. नोव्हेंबरमध्ये यामध्ये वाढ होऊन ती संख्या 12,086 झाली.

गेल्या काही वर्षांत खोऱ्यात आलेले पर्यटक

2020 मध्ये 41,223

2019 मध्ये 5 लाख

2018 मध्ये 8 लाख

2017 मध्ये 5 लाख

2015 मध्ये 9 लाख

2018 नंतर परदेशी पर्यटकांची संख्याही घटली

2020 मध्ये 3,856 (सर्वात कमी)

2019 मध्ये 33,779

2018 मध्ये 55,814 (सर्वात जास्त)