आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir Lieutenant Governor Announced A Financial Package Of Rs 1350 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:उपराज्यपालांनी केली 1350 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा, वीज बिलात 50% सूट

श्रीनगर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यातील पर्यटन क्षेत्रासह आर्थिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी १३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेले व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

राज्यात एक वर्षापर्यंत वीज आणि पाणी बिलात फिक्स्ड चार्जवर ५०% आणि मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्कातून सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सिन्हा यांनी शनिवारी ही घोषणा केली. हे पॅकेज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वावलंबी पॅकेजपेक्षा वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हे पॅकेज समुद्रातील थेंबाप्रमाणे असल्याची टीका जम्मू-काश्मीरमधील अपनी पार्टी या पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांनी केली. बुखारी म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोठ्या तरतुदीची गरज आहे. राज्यात ४०,००० कोटींपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.

आर्थिक पॅकेजमुळे राज्यातील प्रत्येक उद्योजकाला आगामी सहा महिन्यांपर्यंत कर्जावरील व्याजात ५ % सूट दिली जाईल. हस्तकला क्षेत्रासाठी क्रेडिट कार्ड योजनेत १ लाख रुपयांची सीमा वाढवून २ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच व्याजावर ७ % सूट दिली जाईल.

दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून हिजबुल मुजाहिदीन आणि अब-बद्र या दहशतवादी संघटनांशी संबंधित सामग्री जप्त करण्यात आली. दुसरीकडे एनआयने डिसेंबर २०१७ मध्ये पुलवामातील लेथपोरामध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी इरशाद अहमद रेशीचे घर जप्त करण्याचा आदेश दिला. पुलावामा जिल्ह्यातील काकपोरा परिसरात वडील नाजिर अहमद रेशी या नावाने इरशादचे घर आहे. त्याला गतवर्षी १४ एप्रिलला अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...