आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरचे एलजी बदलले:मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल, राष्ट्रपतींनी चंद्र मुर्मूंच्या राजीनाम्याला दिली मंजूरी, सिन्हा राहिले आहेत रेल्वे राज्यमंत्री

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गिरीश चंद्र मुर्मू केंद्र शासित जम्मू-कश्मीरचे पहिले उपराज्यपाल होते, त्यांनी बुधवारी राजीनामा दिला होता
  • चर्चा आहे की, मुर्मू यांना कॅग बनवून दिल्लीला पाठवले जात आहे, कारण सध्याचे कॅग राजीव महर्षी या आठवड्यात निवृत्त होत आहेत

माजी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा (61) हे जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल असतील. राष्ट्रपती भवनाने ही माहिती दिली आहे. सिन्हा यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रेल्वे राज्यमंत्री आणि संचार राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. तसेच गेल्या वर्षी गाझीपूरच्या जागेवरून लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यूपीमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नावही चर्चेत आले होते.

गाझीपूर जिल्ह्यातील मोहनपुरा येथे जन्मलेले सिन्हा पूर्व उत्तर प्रदेशातील मागासलेल्या गावांच्या विकासात सक्रिय होते. राजकीय कारकीर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणापासून झाली. 1982 मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1989 ते 1996 या काळात ते भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य होते. 1996 मध्ये प्रथमच लोकसभेवर पोहोचलो. 2014 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूकीत विजय मिळवला.

गिरीश चंद्र मुर्मू यांना कॅगची जबाबदारी मिळू शकते
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गिरीश चंद्र मुर्मू यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुर्मू केंद्र शासित जम्मू-काश्मीरचे पहिले उपराज्यपाल होते. त्यांनी बुधवारी राजीनामा दिला होता. 1985 बॅचचे आयएएस ऑफिसर मुर्मू गुजरात कॅडरचे अधिकारी होते. सूत्रांनुसार, मुर्मू यांना कॉम्पट्रॉलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) बनवून दिल्लीला पाठवले जाऊ शकते. सध्या राजीव महर्षी हे कॅग आहेत. ते याच आठवड्यात निवृत्त होत आहेत.

मुर्मूंनी अचानक राजीनामा दिल्याने उमर अब्दुल्लाने उपस्थित केले प्रश्न
5 ऑगस्ट म्हणजे एक दिवसपूर्वीच काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यास एक वर्ष पूर्ण झाले. त्याच वेळी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर अचानक मुर्मू यांच्या राजीनाम्याची बातमी व्हायरल झाली. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, लेफ्टिनेंट गव्हर्नरसंबंधीत चर्चा अचानक कशी सुरू झाली?

बातम्या आणखी आहेत...