आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir | Marathi News | Security Forces Gun Down Three Infiltrators In Samba Sector Drugs Recovered

पाकिस्तानचा डाव फसला:भारतीय लष्कराची मोठी कारवाई, भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन घुसखोऱ्यांना खात्मा; 180 कोटींचे ड्रग्ज जप्त

सांबा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय सैन्यांच्या जवानाने तीन ड्रग्ज तस्करांचा खात्मा केला आहे. जवानांनी त्यांच्याकडून 36 किलो ड्रग्ज देखील जप्त केले आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने सांगितले की, उशिरा रात्री हे तिघे तस्कर भारतीय सीमेवरुन जवानांना चमका देत घुसखोरी करत होते. जवानांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते थांबले नसून, ते भारताच्या दिशेने पुढे येत होते. त्यानंतर अखेर जवानांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांचा खात्मा केला आहे. त्या तिघांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे 36 किलो ड्रग्ज आढळले आहे.

36 पॅकेट हेरॉइन जप्त
बीएसएफचे उप महानिरीक्षक एस.पी.एस. संधू यांनी सांगितले की, भारतीय जवानांनी रात्री सुमारे अडीच वाजता या तस्करांना पाहिले. त्यानंतर त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले असता, गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याकडून 36 पॅकेट ड्रग्ज सापडले आहे. त्यामध्ये हेरॉइन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ड्रग्जची किंमत 180 कोटी
दहशतवाद्यांकडून बीएसएफने 36 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या जवानांनी तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या तीन ड्रग्ज तस्करांना ठार केले आहे. त्यांच्याकडून हेरॉईनची 36 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत सुमारे 180 कोटी आहे.

बातम्या आणखी आहेत...