आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरात रुग्णालयावर दहशतवादी हल्ला:श्रीनगर येथे रुग्णालय, सैनिकांवर गोळीबार करून पळाले दहशतवादी; जवानींनी सुद्धा दिले चोख प्रत्युत्तर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगरच्या बेमिना येथे असलेल्या शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SKIMS) समोर शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. नागरिकांच्या उपस्थितीचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

दहशतवादी संघटना गाझी स्क्वॉडने बेमिना येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

याआधी, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात खाणीच्या स्फोटात एक जवान जखमी झाला होता. जिल्ह्यातील केरणी येथील सीमावर्ती भागात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दहशतवादी संघटना गाझी स्क्वॉडने बेमिना येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवादी संघटना गाझी स्क्वॉडने बेमिना येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सामान्य लोकांना लक्ष्य करताहेत दहशतवादी
गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 5 सामान्य लोकांची हत्या केली आहे. यामध्ये श्रीनगरमधील एक काश्मिरी पंडित ड्रग डीलर, एक काश्मिरी पंडित शिक्षिका, शीख समुदायाच्या महिला प्राचार्या, बिहारमधील एक रस्त्यावरचा विक्रेता आणि बांदीपोरा येथील रहिवासी यांचा समावेश आहे.

लष्कर-ए-तैयबाचे 6 दहशतवादी ठार
यापूर्वी राजौरीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 6 दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी नवी रणनीती बनवली आहे. या अंतर्गत थांबा, गावापर्यंत दहशतवाद्यांना येऊ द्या, मग त्यांना तोडण्याचे धोरण राबवले जात आहे. गेल्या काही महिन्यांत लष्कराचे 9 ते 10 दहशतवादी पाकिस्तानातून राजौरी-पुंछ जिल्ह्यातील जंगलात घुसले होते. याशिवाय घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले, पण लष्कराने ते हाणून पाडले.

बातम्या आणखी आहेत...