आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ammu Kashmir Perfume IED Bomb Conspiracy Update; Perfume IED Used For Blast | Terrorism | Jammu Kashmir Police

जम्मू-काश्मिरात परफ्यूम बॉम्ब हल्ल्याचा कट:स्पर्श करताच होतो स्फोट, अटकेतील दहशतवाद्याकडून जप्त

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

21 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या नरवालमध्ये दोन IED स्फोट झाले होते. या हल्ल्यात 9 जण जखमी झाले होते. स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या हँडलरच्या संपर्कात होता. एवढेच नाही तर दहशतवाद्याकडे परफ्यूम बॉम्ब सापडला आहे. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, या परफ्यूमला एखाद्याने स्पर्श करताच किंवा तो दाबताच त्याचा स्फोट होतो. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सुरक्षा दलांनी अशा प्रकारचा परफ्यूम बॉम्ब जप्त केला आहे.

अटकेतील दहशतवाद्याकडून कटाचा खुलासा

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, 20 जानेवारीला दोन IED बॉम्ब पेरण्यात आले होते. 21 जानेवारी रोजी 20 मिनिटांच्या अंतराने हे स्फोट झाले. हे IED एका मोठ्या कटाअंतर्गत पेरण्यात आले होते. पहिल्या स्फोटात 9 जण जखमीही झाले होते. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर रिकामा करून शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर दुसरा स्फोट झाला. अशा स्थितीत या स्फोटात कोणालाही इजा झालेली नाही. तर दुसरा स्फोट अतिशय वेगवान होता.

सरकारी शिक्षक होता दहशतवादी

याप्रकरणी दहशतवादी आरिफला अटक करण्यात आल्याचे दिलबाग सिंह यांनी सांगितले. तो रियासी येथील रहिवासी आहे. आरिफ हा सरकारी शिक्षक आहे. तो गेल्या 3 वर्षांपासून सीमेपलीकडील लष्कर-ए-तय्यबाच्या हस्तकांशी संबंधित होता. दहशतवादी आरिफकडून परफ्यूम बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. प्रथमच अशा प्रकारचा परफ्यूम IED सापडला आहे. त्याने सांगितले की, परफ्यूम बॉम्बमध्ये IEDआहे, जर कोणी त्याला स्पर्श केला, तो उघडला किंवा दाबण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा स्फोट होतो.

दिलबाग सिंह यांना दहशतवादी आरिफचे पाकिस्तानी कनेक्शन मिळाले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना करू देण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून दहशतवादी जगभरात शेकडो निरपराध लोकांची हत्या करत आहेत. पाकिस्तानला जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.

दहशतवादी आरिफची हल्ल्याची कबुली

जम्मू-काश्मीरच्या डीजीपींनी सांगितले की, आरिफने कबूल केले आहे की फेब्रुवारी 2022 मध्ये शास्त्रीनगरमध्ये IED स्फोट झाला होता, ज्यामध्ये आरिफचा सहभाग होता. कटरा येथे झालेल्या स्फोटानंतर बसला आग लागली, आरिफने बसमध्ये IEDपेरल्याचे मान्य केले आहे. वास्तविक, मे 2022 मध्ये ही बस भाविकांसह वैष्णोदेवीला जात होती, तेव्हाच हा स्फोट झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर 22 जण जखमी झाले. त्यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये आरिफला तीन IED मिळाले होते. यातील दोन त्यांनी नरवालमध्ये वापरले. या भागात तो सातत्याने दहशतवादी कारवाया करत होता.

बातम्या आणखी आहेत...