आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir | Police Recover IEDs, Rs 5 Lakh Cash Dropped By Drone In Samba

जम्मूच्या सांबामध्ये संशयास्पद पॅकेटमध्ये स्फोटके:पाकिस्तानातून ड्रोनद्वारे टाकण्यात आल्याचा संशय; लष्कराची शोधमोहीम सुरूच

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मूच्या सांबा जिल्ह्यात गुरुवारी पोलिसांना एक सीलबंद पॅकेट आढळले. त्यात स्फोटके, शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पाकिस्तानी ड्रोनने ही पाकिटे टाकली असल्याचा पोलिसांना संशय आहे.हे स्फोटक पदार्थ काही मोठ्या घटनेला पार पाडण्यासाठी टाकण्यात आले होते. आमच्या टीमने दहशतवाद्यांचा हा कट उधळून लावला आहे, असे सांबाचे एसएसपी अभिषेक महाजन यांनी सांगितले.

विजयपूरच्या सावंखा वळणापासून काही अंतरावर एका शेतात सीलबंद पाकिट सापडले आहे.
विजयपूरच्या सावंखा वळणापासून काही अंतरावर एका शेतात सीलबंद पाकिट सापडले आहे.

विजयपूरमधील सावंखा मोरपासून काही अंतरावर एक सीलबंद पॅकेट पडलेले असल्याची माहिती सकाळी 6 वाजता एका व्यक्तीने आम्हाला दिली होती. त्यानंतर माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. पाकिटातून 5 लाख रुपये, 2 चायनीज पिस्तूल, 4 मॅगझिन, एक स्टील इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (IED) जप्त करण्यात आले आहे.

आयईडी आणि रोख रक्कम मिळाल्यानंतर लष्कराने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
आयईडी आणि रोख रक्कम मिळाल्यानंतर लष्कराने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

दहशतवाद्यांना अटक

पोलीस आणि सुरक्षा दलांनी 22 नोव्हेंबर रोजी लष्कराच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. बांदीपोरा येथे लष्कराचे दोन सक्रिय दहशतवादी आणि एका महिलेसह दोन साथीदारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, आयईडी तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

टेरर फंडिंगवर लगाम

सुरक्षा दल आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जवळपास आणखी 200 मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा अतिरेकी फंडिंगशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात यूएपीएअंतर्गत कारवाई केली जात आहे. सूत्रांनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केलेल्या काश्मीर दौऱ्यात अतिरेकी आणि त्यांना सहानुभूती दाखवणाऱ्यांवर कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले होते.

सीमेपलीकडील अतिरेक्यांनी लाँचपॅड बदलले

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे सीमेपलीकडील अतिरेक्यांनी आपले तळ जम्मू क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवले आहेत. गुप्त माहितीनंतर लष्कर व सुरक्षा रक्षकांनीही धोरण बदलले आहे. अतिरेकी संघटनांचे हँडलर सीमेवरील कुंपण तोडून घुसखोरी करणाऱ्या छोट्या गटांना ढकलण्याचा प्रयत्न करतात. सुरक्षा दलांनी घुसखोरीची अनेक संभाव्य ठिकाणे शोधून गस्त वाढवली आहे. घुसखोरी रोखण्याचे धोरण आखण्यासाठी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आव्हानांच्या व्यापक समीक्षेसाठी सोमवारपासून दिल्लीत ५ दिवसांची बैठक घेत आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, काश्मिरातील उंच भागांत बर्फवृष्टीनंतर अतिरेक्यांचा संपूर्ण फोकस जम्मू सीमेकडील सियालकोट सेक्टरच्या मैदानी भागातील लाँचिंग पॅड्सवर आहे.

बातम्या आणखी आहेत...