आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir Scam Updates: Jammu And Kashmir Is Still Under Investigation For Decades Ago; News And Live Updates

कलंकितांना मलाईदार पदे !:जम्मू-काश्मीर दशकांपूर्वीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अजूनही तपास सुरूच

श्रीनगर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणाच्या तपासात प्रगती नाही, कार्यसंस्कृती जाहीर

जम्मू-काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी वॉर अगेन्स्ट करप्शन ही मोहीम सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (एसीबी) सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात लाचखोरी, पदाचा गैरवापर इत्यादी प्रकरणांत सतत गुन्हे दाखल करत आहे. एवढे असूनही वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही अधिकार, पद आणि पदाेन्नतीच्या आनंदात मश्गूल आहेत. बहुतांश खटल्याचा तपास कूर्मगतीने केला जातोय. काही नोकरशहांच्या विरोधात दशकाभरापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्याचाही तपास सुरू आहे. त्याच्या फाइल धूळ खात पडल्या आहेत. बेहिशेबी मालमत्तेची प्रकरणे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील मोहिमा सातत्याने चालल्याचा नेहमी दावा केला जातो, परंतु सुरू असलेल्या तपासाचे चित्र पाहिल्यावर भलतेच वास्तव समोर येते. ३१ मार्च २०१९ च्या सामाजिक, सर्वसाधारण, आर्थिक, महसुली क्षेत्राबाबत अलीकडेच जारी कॅगच्या अहवालात जम्मू-काश्मीरच्या कार्यसंस्कृतीचे असे दर्शन घडून आहे. अनेक वर्षांच्या विकासकार्यासाठी निधीचा वापर करण्यात आलेला नाही. विविध प्रकरणांत पैशाची लूट करण्यासाठी अनावश्यक खर्च केल्याचे दिसते. बहुतांश भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत कोणालाही शिक्षा झालेली नाही.

केस-1 - गुलमर्ग जमीन घोटाळ्यातील आरोपी बशीर पदावर कायम
२००९ मधील चर्चित गुलमर्ग जमीन घोटाळ्यात बशीर अहमद खानचे नाव आले. खान तेव्हा बारामुलाचे उपअधीक्षक होते. तेव्हा त्यांच्यावर कोट्यवधींची सरकारी जमिनी बेकायदा खासगी हॉटेल मालकांना दिल्याचा आरोप आहे. मार्च २००९ मध्ये खानसह २० जणांवर (FIR No. 08/2009 P/S VOK) गुन्हा दाखल झाला. २०१६ मध्ये खान यांना पदोन्नती मिळाली. २०१९ मध्ये सेवानिवृत्तीत वाढ मिळाली.

केस-2 - रोशनी जमीन घोटाळ्यातील आरोपी सीईओ आता प्रधान सचिव
मे २०१४ मध्ये रोशनी जमीन घोटाळ्यात हिर्देशकुमार यांचे नाव आले. न्यायालयाच्या आदेशानुसार जम्मू, उधमपूर, श्रीनगर, पुलवामामध्ये महसूल विभागासंबंधी चार एफआयआर दाखल झाले. २०१९ मध्ये एसबीच्या विशेष न्यायाधीशांनी अंतिम अहवाल फेटाळला. तपास पुन्हा करण्याचे आदेश दिले. सध्या हा तपास सीबीआयकडे आहे. हिर्देश यांच्याकडे प्रधान सचिव पदाचा प्रभार आहे.

केस-3 - फेक गन परवाना घोटाळा; आरोपी आता सचिव पदावर
आयएएस कुमार राजीव रंजन यांचे नाव फेक गन परवाना घोटाळ्यात आहे. सीबीआयने अटक करण्यापूर्वी ते मार्च २०२० मध्ये निलंबित झाले. अटकेच्या वेळी रंजन महानगरपालिका नियंत्रण प्राधिकरणाचे अतिरिक्त सीईआे होते. एका महामंडळाचा उपाध्यक्षपदाचाही भार त्यांच्याकडे होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये राजीव यांचे निलंबन रद्द झाले. आता ते महसूल विभागात अतिरिक्त सचिव आहेत.

  • वर्ष २०१९ मध्ये ४० खटले जम्मू व ३३ काश्मीरमध्ये दाखल झाले. त्यातही केवळ तपासाचा उपचार दिसतो.
  • बहुतांश प्रकरणे बेहिशेबी संपत्ती, लाचखोरी, निधीचा गैरवापराशी संबंधित आहेत.
  • पाच डझनांहून जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे खटले सुरू आहेत.
  • २०२० मध्ये ३३ खटले जम्मूत, काश्मीरमध्ये ३८ खटले दाखल झाले, बहुतांश प्रकरणात तपास सुरूच

बातम्या आणखी आहेत...