आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir's Temperature Rises Every Year, Impact On Apple Cultivation, Latest News And Update

स्वर्गाला लागली हवामानाची नजर:जम्मू काश्मीरचे दरवर्षी वाढत आहे तपमान, उष्णतेमुळे पाण्याचा भीषण तुटवडा, सफरचंदाच्या शेतीला फटका बसण्याची भीती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर आता हवामान बदलाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. येथील बर्फवृष्टी कमी, तर तपमान झपाट्याने वाढत आहे. यामुळे येथे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाले तर याचा थेट फटका खोऱ्याची खरी ओळख असणाऱ्या सफरचंदाच्या शेतीला तथा पर्यायाने जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला बसेल. तज्ज्ञ या स्थितीसाठी हवामान बदल व जागतिक तपमानवाढीला जबाबदार धरत आहेत.

खोऱ्यातील बर्फवृष्टीत घट

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, जम्मू काश्मीरचे तपमान मागील 100 वर्षांत 1.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. हा आकडा जगाच्या सरासरी तपमानाच्या तुलनेत 0.2 ते 0.3 अंश सेल्सिअसने जास्त आहे. खोऱ्यात मागील 4 दशकांत बर्फवृष्टीत सातत्याने घट होत आहे.

हे छायाचित्र दक्षिण काश्मीरच्या लिद्दरवाटचे आहे. या क्षेत्रात नेहमीच बर्फाची चादर अंथरलेली असे. पण, आता मार्च महिन्यात येथे जमीन दिसून येत आहे.
हे छायाचित्र दक्षिण काश्मीरच्या लिद्दरवाटचे आहे. या क्षेत्रात नेहमीच बर्फाची चादर अंथरलेली असे. पण, आता मार्च महिन्यात येथे जमीन दिसून येत आहे.

चिल्लई कलानमध्येही बर्फवृष्टी नाही

मागील 20 वर्षांत जम्मू काश्मीरमधील चार चिल्लई कलान बर्फाशिवाय गेली आहेत. यातील बहुतांश 2010 नंतर पहावयास मिळाले. चिल्लई कलान जम्मू-काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीचा 40 दिवसांचा एक अवधी आहे. याच काळात खोऱ्यात सर्वाधिक बर्फवृष्टी होते.

जम्मूला काश्मीरशी जोडणाऱ्या राजदान पासवरही यंदा कमी बर्फवृष्टी झाली. हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे 3300 वर्ग मीटर उंचीवरील हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो.
जम्मूला काश्मीरशी जोडणाऱ्या राजदान पासवरही यंदा कमी बर्फवृष्टी झाली. हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे 3300 वर्ग मीटर उंचीवरील हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो.

खोऱ्यात उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा

यंदाचा मार्च महिना गत काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक उष्ण राहिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. काश्मिरातील 3 हजार मीटर खालील जवळपास सर्वच लँडस्केपवर सध्या बर्फ नाही. ग्रोइनफॉरमॅटिक्स विभागाचे वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर इरफान राशीद यांनी हे वसंत स्नोमेल्टचे द्योतक असल्याचा दावा केला आहे. यामुळे वसंत ऋुतुमध्ये नद्यांतील पाणी पातळी वाढू शकते. पण, येत्या उन्हाळ्यात म्हणजे जुलै, ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात भीषण जल संकट निर्माण होऊ शकते. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसेल, असे ते म्हणाले.

काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका

काश्मीरची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवंलबून आहे. जवळपास 70 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेती किंवा त्यासंबंधित व्यवसाय रते. हिमशिखरांची उंची सातत्याने कमी होत असल्यामुळे भारतीय हिमालयीन क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकते. यामुळे कृषी उत्पादनात घट, जलविद्युत ऊर्जा निर्मितीत घट, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा व विंटर टूरिझममध्ये घट होण्याची भीती आहे, असे डॉक्टर इम्रान म्हणाले.

वाढत्या उष्णतेमुळे काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळणारी गुलतूरची फुलेही जानेवारी किंवा फेब्रुवारीत वेळेआधीच बहरली आहेता. सामान्यतः ती मार्च-एप्रिलमध्ये उमलतात.
वाढत्या उष्णतेमुळे काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळणारी गुलतूरची फुलेही जानेवारी किंवा फेब्रुवारीत वेळेआधीच बहरली आहेता. सामान्यतः ती मार्च-एप्रिलमध्ये उमलतात.

फुले उमलण्याच्या वेळेत बदल

काश्मीर विद्यापीठाच्या एका संशोधनाद्वारे काश्मीरच्या सुप्रसिद्ध गुलतूर फुलांची (स्टर्नबर्गिया व्हर्नालिस) उमलण्याची वेळ बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. हे फूल सामान्यतः मार्च किंवा एप्रिलम महिन्यात उमलते. पण, गत 10 वर्षांत ते जानेवारीच्या अखेरिस किंवा फेब्रुवारीच्या सुरूवातीस उमलत आहे. काश्मीर विद्यापीठाचे ज्येष्ठ सहाय्यक प्रोफेसर व बॉटनिस्ट डॉक्टर अंजार खुरू यांनी मार्च महिन्यातील उष्णतेमुळे अनेक प्रकारच्या फुलांचा उमलण्याचा काळ 10 ते 15 दिवसांनी घटल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

सफरचंदाच्या शेतीलाही फटका

काश्मीरच्या शेर ए काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या फ्रूट सायंस डिपार्टमेंटचे सहाय्यक प्रोफेसर डॉक्टर अब्दुल रउफ मलिक यांनी काश्मीरसह भारताच्या इतर डोंगराल राज्यांतील सफरचंदाची पारंपरिक शेती क्लायमेट चेंजमुळे संकटात सापडल्याचे म्हटले आहे.

सफरचंदाच्या शेतीसाठी काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडणे गरजेचे असते. पण, थंडी कमी झाल्यामुळे सफरचंदाची शेती प्रभावित झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसला आहे.
सफरचंदाच्या शेतीसाठी काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडणे गरजेचे असते. पण, थंडी कमी झाल्यामुळे सफरचंदाची शेती प्रभावित झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसला आहे.

एका संशोधनाचा दाखला देत ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील कुल्लू सफरचंदाच्या शेतीसाठी ओळखले जाते. पण, मागील 20 वर्षांतील कमी बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची शेती संकटात सापडली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे उत्पन्न जवळपास 80 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. सफरचंदाच्या बहुतांश प्रजातींना 1 हजार ते 1600 तास 7.2 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तपमानाची गरज असते.

तपमानवाढीचा उच्च दर

डॉक्टर इरफान यांनी नुकत्याच झालेल्या संशोधनाचा दाखला देत हिमालयासह जगभरातील डोंगराळ भागांतील तपमान सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे. एका संशोधनात तर या तपमानवाढीचा दर अतिउच्च असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे छायाचित्र दक्षिण काश्मीरमधील 3400 मीटर उंचीवरील लिद्दरवाटचे आहे. येथे तुफान बर्फवृष्टी होते. पण, आता तिथे मैदान स्पष्टपणे दिसून येत आहे.
हे छायाचित्र दक्षिण काश्मीरमधील 3400 मीटर उंचीवरील लिद्दरवाटचे आहे. येथे तुफान बर्फवृष्टी होते. पण, आता तिथे मैदान स्पष्टपणे दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...