आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरात एन्काउंटर:​​​​​​​सुरक्षादलाने अनंतनागमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, दहशतवाद्यांसोबत कालपासून सुरू होती चकमक

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी होता

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहमा येथे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी होता. सुरक्षा दलांशी दहशतवाद्यांची बुधवारपासून चकमकी सुरू आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परिसरात शोध मोहीम राबविली जात आहे.

एक दिवसपूर्वी पुलवामात एक दहशतवादी मारला गेला होता
यापूर्वी गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. ही चकमक त्राल क्षेऊाच्या मगहमामध्ये झाली होती. तिकडे बडगाम जिल्ह्यात सीआरपीएफ पार्टीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सीआरपीएफ जवान शहीद झाला होता.

ऑगस्टमध्ये मारले गेलेले दहशतवादी

  • 17 सप्टेंबरला श्रीनगरच्या बटमालूमध्ये सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले होते.
  • 29 ऑगस्टला पुलवामाच्या जदूरा परिसरात सुरक्षादलाने शनिवारी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. तर सैन्याचा एक जवान शहीद झाला होता.
  • 28 ऑगस्टला शोपियांच्या किलूरा परिसरात सुरक्षादलाने चार दहशतवाद्यांना मारले होते. एकाला अटक करण्यात आली होती. हे अल बद्र दहशतवादी संघटनेशी संबंधीत होते.
  • 19 ऑगस्टला दक्षिण काश्मीरमध्ये शोपियांमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमकी झाल्या होत्या. या दरम्यान एक दहशतवादी ठार झाला होता. याच दिवशी हंदवाडाच्या गनीपोरामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.
  • 17 आणि 18 ऑगस्टला बारामूलाच्या करीरी परिसरात चकमक झाली होती. यादरम्यान तीन दहशतवाद्यांना सुरक्षादलाने ठार केले होते. यामध्ये लष्कर ए-तोयबाचे दोन कंमांडर सज्जाद उर्फ हैदर आणि उस्मान यांचा समावेश होता. हैदर बांदीपोरा हत्यांचा मुख्य सुत्रधार होता. तो तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करायचा. विदेशी दहशतवादी उस्मानने भाजपा नेता वसीम बारी, त्यांचे वडील आणि भावाची हत्या केली होती.
बातम्या आणखी आहेत...