आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmi An Encounter Breaks Out Between Terrorists And Security Forces In Wanpora Area Of Kulgam District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:कुलगाममध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी रात्री घराला घेराव घालण्यात आला, यादरम्यान दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केली

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील वानपोरामध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्र जप्त केले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री या परिसरात दहशथवादी लपल्याची माहिती मिळाली होती. पोलिस, आर्मी आणि सीआरपीएफच्या पथकांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले.

यापूर्वी सुरक्षादलानेने गुरुवारी पुलवामासारख्या मोठ्या दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश केला. येथील राजपोरा रोडवरील शादीपुराजवळ एका पांढऱ्या रंगाच्या सेंट्रो कारमध्ये 50 किलो आयईडी (इंप्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस) सापडले. अधिकाऱ्यांना संशय आहे की, जैशच्या दहशतवाद्यांच्या निशान्यावर सीआरपीएफचे जवान होते.

या महिन्यात तीन मोठे एनकाउंटर

  • 19 मे, श्रीनगर: सुरक्षादलाने डाउनटाउन परिसरात हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांना मारले. यातील एक जुनैद सहराई होता, जो कट्टरतावादी संघटना तहरीक-ए-हुर्रियत प्रमुख मोहम्मद अशरफ सहराईचा मुलगा होता.
  • 16 मे, डोडा: सुरक्षादलाने डोडाच्या खोत्रा गावात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी ताहिरला मारले.
  • 6 मे, पुलवामा: सुरक्षादलाने हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला मारले. तो दोन वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये सामील होता.
बातम्या आणखी आहेत...