आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu & Kashmir: 3 Terrorists Including Top Commander Of Jaish e Mohammed Killed, Encounter Between Security Forces And Terrorist In Kulgam Updates

जम्मू-काश्मीरमध्ये एन्काउंटर:कुलगाममध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा, हत्यार केली जप्त, तर लष्कराचे 3 जवानही जखमी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी सांगितले - ठार झालेला दहशतवादी कमांडर आयईडी एक्सपर्ट होता
  • दहशतवाद्यांच्या फायरिंगमध्ये आर्मीचे 3 जवानही जखमी

शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नागनाद शिमार भागात सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांना ठार केले. त्यातील एक जैशचा टॉप कमांडर होता, जो आयईडी तज्ञही होता. दहशतवाद्यांचे शस्त्रे आणि दारू-गोळा जप्त करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, लष्कराचे 3 जवानही जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या इनपुटवर पोलिस आणि सैन्याने शोधमोहीम सुरू केली, त्यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

या महिन्यात 7 एन्काउंटरमध्ये आतापर्यंत 14 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 13 जुलैला अनंनागच्या श्रीगुफवाडा परिसरात जैश-ए-मोहम्मदचे 2 सदस्य ठार करण्यात आले होते. यामधील एक पाकिस्तानी होता.

तारीखठिकाणमारले गेलेले दहशतवादी
2 जुलैमालबाग (श्रीनगर)1
4 जुलैअर्राह (कुलगाम)2
7 जुलैगोसू (पुलवामा)1
11 जुलैनौगाम (कुपवाड़ा)2
12 जुलैसोपोर (बारामूला)3
13 जुलैश्रीगुफवाड़ा (अनंतनाग)2
17 जुलैनागनाद शिमर (कुलगाम)3
बातम्या आणखी आहेत...