आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रात्रभर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तसेच या चकमकीत 3 जवान आणि 1 नागरिक जखमी झाले आहेत. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी शनिवारी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुलचा दहशतवादी कमांडर निसार खांडे मारला गेला. त्याच्याकडून 01 एके-47 रायफलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
सर्व जखमींना उपचारासाठी श्रीनगरमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जेथे सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षा दलांचा परिसराला वेढा
अनंतनागमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून सुरक्षा दलांची शोधमोहीम अजूनही सुरू आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे.
5 महिन्यांत लष्कर आणि जैशचे 27 दहशतवादी मारले गेले
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून 5 महिन्यांत 27 दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये सर्व लश्करच्या 14 आणि जैशच्या 13 जणांचा समावेश आहे. गुरुवारी कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढत आहे
गेल्या काही वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढत आहे. 8 मे पर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 187, 2019 मध्ये 121, 2020 मध्ये 181, 2021 मध्ये 142 आणि 2022 मध्ये 28 जण दहशतवादी संघटनांचा भाग बनले. येथे, गेल्या 4 महिन्यांत काश्मीरमध्ये चकमकीत 460 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.