आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Anantnag Encounter Update | Three Lashkar E Taiba Terrorists Killed, 11 Government Employees Sacked

सरकारी नोकरी करत देशासोबत विश्वासघात:हिजबुल प्रमुख सलाहुद्दीनच्या 2 मुलांसह काश्मीरचे 11 सरकारी कर्मचारी बरखास्त, दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसरीकडे अनंतनागमध्ये लष्करच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर प्रशासनाने सरकारी विभागात कार्यरत 11 कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यांच्यावर देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. बरखास्त झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांसाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

सय्यद सलाहुद्दीन हा काश्मीरचा रहिवासी आहे, परंतु सध्या तो पाकिस्तानात राहणार्‍या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करत आहे. तो संयुक्त जिहाद परिषदेचा प्रमुखही आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांनी संयुक्तपणे या संस्थेची स्थापना केली आहे.

दहशतवाद्यांना अंतर्गत माहिती देत ​​होते
बर्खास्त झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये अनंतनागमधील 4, बडगाममधील 3 आणि बारामुल्ला, श्रीनगर, पुलवामा आणि कुपवाडा येथील प्रत्येकी एक कर्मचारी आहेत. यापैकी शिक्षण विभागात 4, जम्मू-काश्मीर पोलिसात 2 आणि कृषी, कौशल्य विकास, विद्युत, एसकेआयएमएस आणि आरोग्य विभागात प्रत्येकी एक जण होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे लोक दहशतवाद्यांना अंतर्गत माहिती देत ​​होते.

जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी गठित समितीने आपल्या दुसर्‍या बैठकीत 3 आणि चौथ्या बैठकीत 8 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली होती, असे सूत्रांनी सांगितले. या शिफारसी घटनेतील तरतुदीनुसार करण्यात आल्या आहेत.

2 शिक्षक फुटीरतावादाचे समर्थक निघाले
समितीच्या दुसऱ्या बैठकीमध्ये बरखास्तीची शिफारस असणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांमध्ये ITI कुपवाडाच्या एका अर्दलीचा समावेश आहे. तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा ओव्हरग्राउंड वर्कर होता. तो दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालीविषयी माहिती देत होता. त्याच वेळी तो त्यांना आश्रय देत होता.

याव्यतिरिक्त, अनंतनाग जिल्ह्यातील दोन शिक्षक देशद्रोही कार्यात सहभागी असल्याचे आढळून आले. जे जमात-इस्लामी आणि दुख्तारन-ए-मिल्लत या फुटीरतावादी संघटनांच्या विचारसरणीला पाठिंबा आणि प्रचार करत होते.

दुसरीकडे अनंतनागमध्ये लष्करच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा
प्रशासनासोबतच सुरक्षादलानेही शनिवारी दहशतवाद्यांना धडक दिली. अनंदनागच्या रानीपोरामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. IG विजय कुमार यांनी सांगितले की, सर्व लष्कर-ए-तोयबाशी संबंधीत होते.

बातम्या आणखी आहेत...