आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू -काश्मीरमध्ये एन्काउंटर:अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले, सर्च ऑपरेशन सुरु

जम्मू -काश्मीर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू -काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले. नागबेरान त्राल परिसरातील जंगलात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीनही दहशतवादी ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळाला घेरण्यात आले असून शोधमोहीम सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान, दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले गेले, परंतु त्यांनी सैनिकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला, ज्यात तीन दहशतवादी ठार झाले.

पुलवामामध्ये शुक्रवारी 2 दहशतवादी मारले गेले
याआधी शुक्रवारी जम्मू -काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पम्पोर भागातील ख्रू येथे अतिरेक्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्यानंतर तेथे चकमक सुरू झाली. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख ख्रू येथील मुसाईब अहमद भट्ट आणि चकुरा पुलवामा येथील मुजामिल अहमद राथर अशी करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, भट्ट नागरिकांच्या छळासह अनेक दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सामील होता. त्रालच्या लुरगाम भागात जाविद अहमद मलिक नावाच्या नागरिकाच्या हत्येतही त्याचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...