आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारामुल्लाच्या करेरी भागातील नजीभाट क्रॉसिंगवर बुधवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला आहे. IGP काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
मंगळवारी एका पोलिसाचाही मृत्यू झाला होता
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी टार्गेट किलिंगच्या घटना घडवत आहेत. मंगळवारी श्रीनगरमधील सौरा भागातील अचार भागात दहशतवाद्यांनी एका पोलिसावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत त्यांची 9 वर्षांची मुलगी सफा कादरीही जखमी झाली आहे. सफाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सोमवारी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले की त्यांनी लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंधित 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी तिघांचा गेल्या महिन्यात बारामुल्ला येथे झालेल्या सरपंचाच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.
राहुल भट यांच्या हत्येचा निषेध
12 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी चदूरा तहसीलदार कार्यालयातील क्लर्क राहुल भट यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राहुल भटच्या हत्येचा काश्मिरी पंडितांनी केला निषेध
21 मे रोजी अनंतनाग जिल्ह्यातील काश्मिरी पंडितांनी मुंडन करून राहुल भटच्या हत्येविरोधात निदर्शने केली. राहुल भट यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. पंडितांनी जागो मोदी, जागो मोदी, शहीद राहुल भाई अमर रहे, राहुल तेरे खूनी जिंदा है अशा घोषणा दिल्या. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन काश्मिरी पंडितांसाठी सुरक्षित वातावरण का निर्माण करत नाही, असा सवाल त्यांनी केला.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी राहुल भट यांच्या नातेवाईकांची भेट घेतली
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राहुल भट यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबाला प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सिन्हा यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात झाले हल्ले
7 मे रोजी श्रीनगरमधील अली जान रोडवरील आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी गुलाम हसन दार या पोलिसावर गोळ्या झाडल्या. 18 एप्रिल रोजी पुलवामा येथे, काकापोरा रेल्वे स्थानकाबाहेरील दुकानात चहा पिण्यासाठी आलेले दोन रेल्वे सुरक्षा दल (RPF) जवान, इंस्पेक्टर देवराज आणि हेड कॉन्स्टेबल सुरिंदर सिंग यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.