आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Corona News Update | Two Family Relatives Died Before Last Rites At At Cremation Site In Jammu Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:कोरोनाग्रस्ताच्या अंत्यविधीला गेलेल्या दोघांचा मृत्यू, कुटुंबाचा आरोप- पीपीई किट घातल्यामुळे मृत्यू झाला

जम्मू-काश्मीरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संक्रमिताचा मुलगाही बेशुद्ध, मजिस्ट्रियल चौकशीचे आदेश

जम्मूमध्ये तवी नदीवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला गेलेल्या त्याच्या दोन नातेवाईकांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, अद्याप दोघांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. तर, 42 डिग्री तापमानात पीपीई किट घातल्यामुळे डिहायड्रेशन होऊन मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.

ज्या दोघांचा मृत्यू झाला आहे, त्यातील एकाचे वय 40 आणि दुसऱ्याचे 35 होते. हे दोघे कुटुंबातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 65 वर्षीय व्यक्तीच्या अंत्यविधीला गेले होते. यादरम्यान, दुपारी दिड वाजता तापमान 42 डिग्रीवर होते. कुटुंबातील अनिल चोप्रा यांचा आरोप आहे की, उन्हामुळे डिहायड्रेट होऊन दोघांना चक्कर आली, यावेळी पोलिसांनी त्यांना पाणीदेखील पाजले नाही. यादरम्यान, मृत कोरोनाग्रस्ताचा मुलगाही बेशुद्ध झाला. त्याला उपस्थित कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

'प्रशासनाने अंत्यविधीसाठी जागा दिली नाही'

कुटुंबियांनी सांगितले की, आम्हाला शक्ती नगर स्मशानात मृताचा अंत्यविधी करयचा होता, पण प्रशासनाने याची मंजूरी दिली नाही. नंतर आम्हाला तवी नदीवर जावे लागले. प्रशासनाने मंजूरी दिली असती, तर इतक्या दूर जाण्याची गरज पडली नसती आणि ही घटना घडलीच नसती.

बातम्या आणखी आहेत...