आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir | Delhi | Marathi News | Severe Tremors In Punjab, Delhi, Including Jammu And Kashmir; People Fled Their Homes For Fear Of An Earthquake

भूकंपाचे झटके:जम्मू-काश्मीरसह पंजाब, दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र झटके; भूकंपाच्या भीतीने नागरिक भयभीत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या काही भागात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. शनिवारी सकाळी 9.49 दरम्यान भूकंपाचे झटके जाणवले. जम्मू-काश्मीर पाठोपाठ दिल्ली-NCR(नोएडा) आणि चंडीगढ या शहरात देखील भूकंपाचे झटके जाणवल्याने लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात अनेक भागात भूकंपाचे झटके जाणवत असून, सध्या कोणत्याही प्रकारे जीवीतहानी झालेले नाही. तिकडे पाकिस्तानमध्येही भूकंपाची झटके जाणवले असून, त्याची तिव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अफगानिस्तान आणि ताजिकिस्तान बॉर्डरवरील हिंदुकुश डोंगराळ भागात आहे. मात्र यापुर्वी अशी माहिती समोर आली होती की, पाकिस्तानात भूकंपाची तिव्रता 7.3 रिश्टर स्केल इतकी असून, इस्लामाबाद पासून 189 किलोमीटर भुकंपाचा केंद्र होता. मात्र त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने माहिती दिली की, भुकंपाचा केंद्र हा अफगानिस्तान-ताजिकिस्तान बॉर्डरवर आहे.

दिल्ली एनसीआरमध्ये 15-20 सेंकद जमीन हादरली

दिल्ली एनसीआरमध्ये सुमारे 15-20 सेंकद भूकंपाचे झटके जाणवले आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. तर तिकडे नोएडात देखील भुकपांचे मोठ्या प्रमाणात झटके जाणवले.

बातम्या आणखी आहेत...