आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मूमध्ये महिला डॉक्टरची तिच्याच डॉक्टर प्रियकराने चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. खाजगी कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने फेसबूकवर पोस्ट शेअर करत सांगितले. ही पोस्ट पाहताच नातेवाकांनी पोलिसांना बोलावले. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले.
सुमेधा शर्मा असे मृत तरुणीचे तर जौहर गनई हे तरुणाचे नाव आहे. दोघांनीही जम्मूमधील डेंटल कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) केले. BDS केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सुमेधा दिल्लीत गेली होती. होळीच्या सुट्ट्या घालवण्यासाठी ती जम्मूत आली होती. जौहरला भेटण्यासाठी ती त्याच्या घरी गेली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि जौहरने तिच्या पोटावर चाकूने अनेक वार केले. यातच तिचा तडपून मृत्यू झाला.
सुमेधाचा मृत्यू झाल्यानंतर जौहर घाबरला आणि स्वतःही आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबूकवर केली. पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा सुमेधाचा मृतअवस्थेत तर जौहर जखमी अवस्थेत आढळून आला.
वाद कशामुळे झाला?
पोलिसांनुसार, सुमेधा आणि जौहर अनेक काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तरुणाविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांमधील वादाचे कारण कोणते, याचा शोध घेतला जात आहे. रुग्णालयातून जौहरला डिस्चार्ज मिळताच चौकशीसाठी पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत.
श्रद्धाचे तुकडे करताना काय विचार करत होता आफताब
दिल्लीतील छतरपूर येथे एका कॉमन फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आफताबवर त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याने केवळ हत्याच केली नाही तर मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. काही कुत्र्यांना खाऊ घालले तर काही मेहरौलीच्या जंगलात फेकले. एवढी भीषण घटना घडूनही तो सामान्य जीवन जगत होता. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये, आम्ही आफताब आणि त्याच्यासारख्या इतर भयानक खुनींच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करतोय…सर्वात आधी ग्राफिक्समध्ये वाचा, आफताबसारख्या मारेकऱ्यांची कथा... येथे वाचा संपुर्ण बातमी.
नवऱ्याने बायकोचे 50 तुकडे करून फेकले
झारखंडच्या रेबिकाच्या पतीने तिचे 50 तुकडे करत फेकून दिले. लखनौमध्ये भावाने लहान बहिणीची हत्या करत तिचा मृतदेह घरातच पुरला. या सर्व घटनांत एक गोष्ट समान आहे - पीडित महिला आणि आरोपी पुरूष होता. काहींमध्ये आरोपी नातलग होता तर काहींमध्ये अज्ञात व्यक्ती.
तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की एखादा पुरूष एखाद्या महिलेची इतक्या निर्घृणपणे हत्या कशी करू शकतो? महिलेपासून पिच्छा सोडवणे किंवा फक्त फॅन्टसीसाठी एखाद्या महिलेची हत्या करणे योग्य आहे का? पुरुषांच्या या मानसिकतेसाठी इंग्रजीत एक शब्द आहे - 'फेमिसाईड' फेमिसाईडचा सरळ अर्थ आहे - महिलांची त्यांच्या जेंडर म्हणजेच लिंगामुळे हत्या करणे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.