आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीत ७५ जागा जिंकून भाजप सर्वात माेठा पक्ष ठरला आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सात पक्षांचे पीपल्स अलायन्स फाॅर गुपकार डिक्लेरेशनला ११२ जागा मिळवता आल्या. राज्य निवडणूक आयाेगाने निकाल जाहीर केला. त्यात नॅशनल काॅन्फरन्स-६७, पीपल्स डेमाेक्रॅटिक पार्टी-२७, जम्मू-काश्मीर पीपल्स डेमाेक्रॅटिक फ्रंट-२, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)-५, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट-३, जम्मू-काश्मीर पीपल्स काॅन्फरन्स-८ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला २६ जागांवर विजय मिळाला.अल्ताफ बुखारी यांच्या जम्मू-काश्मीर पार्टीने १२ जागी विजय मिळवला. ४९ जागांवर अपक्ष निवडून आले. इतर पक्षांमध्ये जम्मू काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीला २ आणि बसपाला एका जागी विजय मिळाला. डीडीसीच्या २८० जागांसाठी आठ टप्प्यांत २८ नाेव्हेंबरपासून १९ डिसेंबरदरम्यान मतदान झाले हाेते. मतमाेजणी मंगळवारपासून सुरू झाली हाेती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना म्हणाले, आमच्या पक्षाने अतिशय चांगली कामगिरी केली. जम्मू-काश्मीरच्या जनतेने फुटीरवाद्यांना चपराक दिली आहे, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी पक्षाच्या मुख्यालयात आयाेजित पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, पक्षाला ४ लाख ८७ हजार ३६४ मते मिळाली. नॅशनल काॅन्फरन्सला २ लाख ८२ हजार ५१४, पीडीपी-५७ हजार ७८९, काँग्रेसला १ लाख ३९ हजार ३८२ मते मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.