आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Election New Voters Updates ।Meeting Called By Opposition । Administration Said Whoever Lives Has The Right To Vote There । Farooq Abdullah All Party Meet

जम्मू-काश्मिरात 25 लाख नव्या मतदारांमुळे वाद:नव्या बदलांच्या विरोधात एकवटले विरोधी पक्ष, अब्दुल्लांनी बोलावली बैठक

लेखक: हारुण रशीद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मिरात पहिल्यांदाच बाहेरच्या राज्यांतून आलेले आणि जम्मू-काश्मीरमध्ये तात्पुरते वास्तव्य करणारे बिगर-काश्मिरीही मतदान करू शकतील. यामध्ये स्थलांतरित कामगार, मजूर, इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे.

जम्मू-काश्मीर प्रशासनाने म्हटले आहे की, भारतात तात्पुरता वास्तव्य करणारा प्रौढ व्यक्ती आपले मत देऊ शकतो. कलम 370 लागू असताना कायम रहिवासी हे मतदार होते. आता परिस्थिती बदलली आहे.

फारुख अब्दुल्ला यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

कलम 370 रद्द केल्यानंतर बरोबर 3 वर्षांनंतर या घोषणेने विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर जम्मू-काश्मीरला प्रयोगशाळेत बदलल्याचा आरोप केला. हा निर्णय काश्मीरमधील लोकशाहीचा गळा घोटणारा ठरेल, या प्रक्रियेचा उद्देश स्थानिक लोकसंख्येला हक्कापासून वंचित ठेवण्याचा आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी 22 ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यातूनच भविष्यातील रणनीती ठरणार आहे.

जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सने म्हटले धोकादायक

जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन म्हणाले की, हे धोकादायक आहे. मला माहिती नाही की, त्यांना काय साध्य करायचे आहे. 1987 आठवा. त्यातून आपण अजून बाहेर पडलेलो नाही. 1987 ची पुनरावृत्ती करू नका.

दुसरीकडे, माजी मंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते जीएच मीर म्हणाले, जर मतदार हक्क कायदा इतर राज्यांमध्ये लागू झाला तर तो जम्मू-काश्मीरमध्येही लागू होईल. जर ते फक्त जम्मू-काश्मीरमध्ये लागू केला जात असेल तर आम्ही त्याविरोधात लढा देऊ. मात्र, नवीन मतदार जोडण्याचा मुद्दा विरोधी पक्षांकडून केला जात असल्याचे अन्य नेत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या जनतेनेही या निर्णयाचा बचाव केला आहे.

स्थानिक नागरिक अमित रैना यांनी सांगितले की, मुफ्ती मोहम्मद सईद यांनी 1989 मध्ये यूपीमधील मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवली आणि जिंकून गृहमंत्री बनले. दिल्लीत राहणारा एक काश्मिरी म्हणाला, मी दिल्लीत आहे आणि दिल्लीतच मतदान करतो. मला फक्त एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. जर गैर-काश्मिरी नागरिकाने पात्रता पूर्ण केली तर तो काश्मीरमध्येही मतदान करू शकतो.

25 लाख मतदार गेम चेंजर ठरतील

  • जम्मू-काश्मीरमध्ये आता किती मतदार आहेत? 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादी अपडेट करण्यात आली, तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये 78.4 लाख मतदार होते. यापैकी 2 लाख मतदार लडाखमध्ये होते, जे वेगळे झाले आहेत.
  • गेल्या वेळी किती मतदार होते? 2019 मध्ये 6.5 लाख नवीन मतदार जोडले गेले. या वर्षाच्या अखेरीस 25 लाख मतदार जोडले गेले, तर केंद्रशासित प्रदेशातील मतदारांची संख्या 76.4 लाखांवरून 1.1 कोटी होईल.
  • किती लोक 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत? निवडणूक आयोगाच्या मते, जम्मू-काश्मीरमध्ये 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांची प्रस्तावित संख्या 98 लाख आहे. तर 76.4 लाख लोकांची नावे मतदार यादीत आहेत. स्थलांतरित कामगारांची संख्या 7.50 लाख आहे.
  • नवीन मतदार राजकीय समीकरण कसे बदलणार? 2014 च्या निवडणुकीत पीडीपीला 10.92 लाख आणि भाजपला 11.07 लाख मते मिळाली होती. 22 लाख मतांनी सरकार स्थापन केले. आता सर्व विधानसभा मतदारसंघात 25 लाख मतदार धोरणात्मकरीत्या ठेवल्यास ते निर्णायक ठरतील. उदाहरणार्थ, गुरेझ 2014 मध्ये 17,624 मतदार होते. सीमावर्ती भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल आणि हजारो कामगार आहेत. सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास हा आकडा निर्णायक ठरेल.
बातम्या आणखी आहेत...