आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुरक्षादलांनी आज शोपियां जिल्ह्यातील रेबन गावात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या भागात दहशवादी लपल्याची सुरक्षा दलांनी माहिती मिळाली होती. यानंतर सकाळी शोधमोहिम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 5 दहशवादी ठार केले.
यरीपोरा चकमकीदरम्यान वाचला होता नाली
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पुलवामा आणि कुलगामचे हिजबुल कमांडर फारूक अहमद भट उर्फ नालीचा समावेश आहे. तो ए++ दहशवाद्यांची यादील समाविष्ट आहे. दोन आठवड्यांपूर्वी यारीपोरात झालेल्या चकमकीदरम्यान नाली देखील वाचला होता. डीएसपी देविंदर सिंहसोबत दहशतवादी नावीद बाबूच्या अटकेनंतर हिजबुलने नालीला दक्षिण काश्मीरची जबाबदारी सोपवली होती.
यावर्षी जानेवारीत देविंदर सिंह दहशतवादी नवीद बाबूला जम्मूला घेऊन जात होते. नवीदला पाकिस्तानला जायचे होते. मात्र, देविंदर यांना नवीद बाबू आणि दहशतवादी समर्थक इरफान अहमद याच्यासमवेत पकडण्यात आले. नवीद दहशतवादी बनण्यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसात होता. 2017 मध्ये नवीद बडगावमधून 5 एके-47 घेऊन फरार झाला होता.
दहशतवाद्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार नाही
पोलिसांनी अद्याप ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. मात्र सुत्रांनी सांगितले की, नाली व्यतिरिक्त सक्लेन रेबन गावातील अहमद वागेर, बाबापोरा येथील सफैत अमीन नायक देखील या चकमकीत ठार झाले. त्यांच्याकडे एके-47 रायफल आणि पिस्टल मिळाली. या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देणार नाहीत.
सुरक्षा दलांच्या कारवाईंमुळे दक्षिण काश्मीरमधून आपला तळ हलवत आहेत दहशतवादी
5 जून रोजी राजौरीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. काश्मीर ते शोपियांमार्गे काश्मीरला आलेल्या मुगल रोडमार्गे काश्मीरला आलेल्या या गटाचा हा दहशतवादी होता. सुरक्षा रक्षकांनुसार काश्मीर घातील सुरु असलेल्या मोहिमांपासून पळून हे दहशतवादी जम्मूत पोहचले होते. मागील काही महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांनी घाटीत टॉप कंमाडरचा खात्मा केला तेव्हापासून दहशतवादी आपला तळ दक्षिण काश्मीरमधून राजौरी आणि पुंछमध्ये हलवत आहेत.
#Encounter has started at #Reban area of #Shopian. Police and security forces are on the job. Further details shall follow. @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 7, 2020
मागील काही दिवसात 4 मोठे एनकाउंटर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.