आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील पिंजोरा भागात सोमवारी सुरक्षा दलाने चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरील माहितीवरून सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. याआधी रविवारी शोपियांच्या रेबन गावात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पुलवामा आणि कुलगामचा हिजबुल कमांडर फारूक अहमद भट उर्फ नाली हादेखील रविवारच्या चकमकीत मारला गेला. तो ए ++ दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट होता.
8 दिवसांत 6 चकमकी, 18 दहशतवाद्यांचा खात्मा
गुप्तचर यंत्रणेने गेल्या महिन्यात पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीची इशारा दिला होता. यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.
> 1 जून : नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलाने तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
> 2 जून : पुलवामाच्या त्राल भागात दोन दहशतवादी ठार झाले.
> 3 जून: पुलवामा येथील कंगन भागात सुरक्षा दलाने 3 अतिरेक्यांना कंठस्नान घातले.
> 5 जून : राजौरी जिल्ह्यातील कालाकोट येथे एक दहशतवादी ठार केला.
> 7 जून : शोपियांच्या रेबन गावात पाच अतिरेकी ठार झाले.
> 8 जून : शोपियांमधील पिंजोरा भागात 4 दहशतवाद्यांना ठार केले.
सुरक्षा दलांच्या कारवाईंमुळे दक्षिण काश्मीरमधून आपला तळ हलवत आहेत दहशतवादी
5 जून रोजी राजौरीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. काश्मीर ते शोपियांमार्गे काश्मीरला आलेल्या मुगल रोडमार्गे काश्मीरला आलेल्या या गटाचा हा दहशतवादी होता. सुरक्षा रक्षकांनुसार काश्मीर घातील सुरु असलेल्या मोहिमांपासून पळून हे दहशतवादी जम्मूत पोहचले होते. मागील काही महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांनी घाटीत टॉप कंमाडरचा खात्मा केला तेव्हापासून दहशतवादी आपला तळ दक्षिण काश्मीरमधून राजौरी आणि पुंछमध्ये हलवत आहेत
मागील काही दिवसात 4 मोठे एनकाउंटर
> 30 मे कुलगाम: वानपोरा परिसरात सुरक्षादलाने चकमकित दोन दहशतवाद्यांना मारले. पोलिसांना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारु-गोळा जप्त केला.
> 19 मे श्रीनगर: सुरक्षा दलाने डाउनटाउन परिसरात हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांना मारले. यातील एक जुनैद सहराई होता, जो कट्टरतावादी संघटना तहरीक-ए-हुर्रियत प्रमुख मोहम्मद अशरफ सहराईचा मुलगा होता.
> 16 मे डोडा: डोडाच्या खोत्रा गावात हिजबुल मुजाहिदीनचा हदशतवादी ताहिरला 5 तासांच्या चकमकित मारण्यात आले.
> 6 मे पुलवामा: सुरक्षादलाने हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला मारले. तो दोन वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये सामील होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.