आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्या हा दहशतवाद्यांचा गड मानला जात होता. येथील त्रालमध्ये दहशतवादी कमांडर बुरहान वानी आणइ जाकिर मूसासारखे दहशतवादी जन्माला आले. दोघही यापूर्वीच सुरक्षादलाकडून मारले गेले आहे. शुक्रवारी त्रालच्या चेवा उल्लार परिसरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कश्मीर झोनचे आयची विजय कुमार यांनी सांगितले की, 1989 पासून त्रालमध्ये दहशतवादी संक्रिय होते. मात्र आता येथे हिजबुल मुजाहीदीन किंवा दुसऱ्या कोणत्याही संघटनेचे दहशतवादी राहिलेले नाही. सर्व मारले गेले आहे. 31 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतीपोराच्या त्रालमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर गुरुवारी संध्याकाळी सैन्य, सीआरपीएफ आणइ पोलिसांना या परिसरात शोध मोहिम सुरू केली. सेनाचे ब्रिगेडियर व्ही महादेवन यांनी सांगितले की, आम्ही दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगितले, मात्र त्यांनी जवानांवर फायरिंग करण्यास सुरूवात केली. या कारवाईत 3 दहशतवादी मारले गेले, शुक्रवारी त्याचे मृतदेह सापडले.
अनंतनामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला
तिकडे अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहरामध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पार्टीवर फायरिंग केली. या हल्ल्यात एक जवान आणि 5 वर्षांच्या मुलाला गोळी लागली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही तोपर्यंत मृत्यू झाला होता.
जूनमध्ये झालेल्या 15 चकमकींमध्ये 46 दहशतवाद्यांचा खात्मा
यापूर्वी गुरुवारी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातही 2 दहशतवादी ठार झाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये या महिन्यात 15 चकमकीत आतापर्यंत 46 दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांच्या मदतनीसांना पकडण्याची प्रक्रियाही सुरू आहे. बुडगामच्या नरबळ भागात बुधवारी सैन्य आणि पोलिसांनी कारवाई करत 5 लष्कर-ए-तैयबा मदतनीसांना अटक केली. ते पाकिस्तानशी संबंधीत असल्याची माहिती मिळाली आहे.
26 दिवसात 15 एन्काउंटर
तारीख | ठिकाण | मारले गेलेले दहशतवादी |
1 जून | नौशेरा | 3 |
2 जून | त्राल (पुलवामा) | 2 |
3 जून | कंगन (पुलवामा) | 3 |
5 जून | कालाकोट (राजौरी) | 1 |
7 जून | रेबन (शोपियां) | 5 |
8 जून | पिंजोरा (शोपियां) | 4 |
10 जून | सुगू (शोपियां) | 5 |
13 जून | निपोरा (कुलगाम) | 2 |
16 जून | तुर्कवंगम (शोपियां) | 3 |
18-19 जून | अवंतीपोरा और शोपियां | 8 |
21 जून | शोपियां | 3 |
23 जून | बंदजू (पुलवामा) | 2 |
25 जून | सोपोर (बारामूला) | 2 |
25-26 जून | त्राल (पुलवामा) | 3 |
एकूण 46 |
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.