आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काश्मीरमध्ये सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. श्रीनगरच्या लावापोरा परिसरात मंगळवारी एन्काउंटर सुरू केले होते जे 15 तासांपेक्षा जास्त वेळ चालले. पोलिसांनी दहशतवाद्यांना सरेंडर करण्याची संधी दिली. मात्र त्यांनी फायरिंग सुरू केली. ठार झालेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत याची अद्याप माहिती मिळालेली नाही. सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.
#SrinagarEncounterUpdate: 02 more unidentified #terrorists killed (Total 03). #Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/8fsswJKIPr
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 30, 2020
बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे हत्यार मिळाले आहेत
दरम्यान पोलिस आणि आर्मीच्या टीमने नियंत्रण रेषेजवळ बालाकोट येथील मेंढर सेक्टरमध्ये 2 पिस्तुल, 70 कारतूस आणि 2 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. पुंछच्या SSP रमेश अग्रवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी हँडलर्सने हत्यार पाठवले होते. रविवारी दहशतवाद्यांच्या 3 मदतगारांच्या अटकेनंतर हत्यारांची माहिती मिळाली होती.
जम्मू-कश्मीरमध्ये यावर्षी 203 दहशतवाद्यांना कंठस्नान
न्यूज एजेंसीच्या सूत्रांनुसार सुरक्षादलाने यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 203 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये 166 लोकल आणि 37 पाकिस्तानी होते. यावर्षी 49 दहशतवादी अटक करण्यात आले आणि 9 जणांनी सरेंडर केले. दक्षिण काश्मीरमध्ये सर्वात जास्त दहशतवादी ठार करण्यात आले. शोपियां, कुलगाम आणि पुलवामामध्ये जास्त एन्काउंटर झाले. याच परिसरांमध्ये दहशतवादी संघटनांनी स्थानिक तरुणांचा जास्त भरती केले होते.
यावर्षी 96 दहशतवादी घटना घडल्या
यामध्ये 43 सामान्य लोक ठार झाले आणि 92 जखमी झाले. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. 2019 मध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला होता. 185 लोक जखमी झाले होते. यावर्षी केवळ 14 IED विस्फोटक मिळाले. गेल्यावर्षी हा आकडा 36 होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.