आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Encounter Today | Pakistan Jaish Terrorists Encounter In Jammu Srinagar National Highway Near Nagrota

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सक्लूसिव्ह:जम्मू एन्काउंटरमध्ये मोठा खुलासा, पाकिस्तानमध्ये बसलेला मसूद अजहरचा भाऊ रऊफ लालाने रचला होता कट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक होते, चौघांनी मंगळवार-बुधवारच्या रात्री घुसखोरी केली होती
  • या दहशतवाद्यांजवळ 11 एके 47 रायफल, 29 हँड ग्रेनेड आणि तीन पिस्टल सापडल्या होत्या

गुरूवारी सकाळी जम्मूमध्ये झालेल्या चकमकीत मारले गेलेले चार दहशतवादी जैशचे असून पाकिस्तानी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दैनिक भास्करला दिली आहे. जिल्हा विकास परिषद निवडणुकीत मोठा हल्ला करण्याच्या तयारीत ते होते. पाकिस्तानमधील जैशचा म्होरक्या मसूद अझरचा भाऊ रऊफ लालाने हा कट रचला होता. मंगळवारी-बुधवारी रात्री या चौघांनी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरी केली होती.

अलीकडेच हिरानगर सेक्टरमध्ये दिसला होता रऊफ

सूत्रांच्या माहितीनुसार, 'रऊफ काही दिवसांपासून जम्मूच्या सांबा आणि हीरानगर सेक्टरच्या पलीकडे पाकिस्तानच्या शक्करगढ परिसरात दिसला होता. तसेच या वर्षी 31 जानेवारीला अशीच घुसखोरी करणे आणि चकमकींमागेर तो मास्टरमाइंड होता. तेव्हाही सुरक्षादलाने दहशतवाद्यांना बन टोल प्लाजाजवळ घेरुन मारले होते. '

पोलिस पहिल्यापासूनच तयारीत होते
गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा एजन्सी आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवाद्यांच्या प्रवेशाची माहिती बुधवारीच दिली होती. अशा परिस्थितीत पोलिसांचे पथक सज्ज झाले. जम्मूचे आयजी मुकेश सिंग यांच्या नेतृत्वात एसएसपी श्रीधर पाटील आणि एसपी नरेशसिंग यांनी संपूर्ण चकमकी केल्या.

सूत्रांनुसार रऊफ गेल्या काही दिवसांपासून शक्करगढ लॉन्चिंग पॅडमधील फिदायीन दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न करत होता. असे बोलले जात आहे की, घुसखोर चार आणि दोन अशा ग्रुपमध्ये होते. मात्र याविषयी सुरक्षा एजेंसी तपास करत आहे.

11 एके 47 रायफल, 29 हँड ग्रेनेड जप्त केले
या दहशतवाद्यांकडून 11 एके 47 रायफल, 29 हँड ग्रेनेड आणि तीन पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक साहित्यही मिळाले आहे. ट्रकमध्ये तांदुळाच्या पोत्यांमध्ये लपून जम्मूहून श्रीनगरला जात असलेल्या या दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले.

बातम्या आणखी आहेत...