आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Encounter Today Update; Terrorist Killed, Indian Army Jawan Martyred In Rajouri

जम्मू-काश्मीर एन्काउंटर:राजौरीच्या थानामंडीमध्ये सैन्याने चकमकीत एका दहशतवाद्याचा केला खात्मा, एक जवानही शहीद

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 वर्षांच्या मुलाचा ग्रेनेड हल्ल्यात झाला होता मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले. या चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, शहीद जवान हे आर्मीत कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (JCO) म्हणून तैनात होते.

सुरक्षा दलांना थानामंडी, राजौरीमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, एका दहशतवाद्याने लष्कराच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. लष्करानेही प्रत्युत्तर दिले.

लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्सच्या जेसीओला चकमकीत गोळी लागली. त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. राजौरीच्या एसपी शीमा नबी कसबा यांनी सांगितले की, अजूनही चकमक सुरू आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये थानामंडी परिसरात ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी चकमकीत ठार झाले होते.

2 वर्षांच्या मुलाचा ग्रेनेड हल्ल्यात झाला होता मृत्यू
जम्मू -काश्मीरच्या राजौरीमध्ये 12 ऑगस्टच्या रात्री दहशतवाद्यांनी भाजप नेते जसबीर सिंह यांच्या घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जसबीर आणि त्याच्या कुटुंबातील 4 सदस्य गंभीर जखमी झाले होते. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे या हल्ल्यात 2 वर्षीय वीर सिंह यांना आपला जीव गमवावा लागला होता. वीर जसबीर यांचा भाचा होता.

बातम्या आणखी आहेत...