आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Encounter Update; Jammu Kashmir Encounter, Indian Army, Terrorist Attack, J&K Encounter

जम्मू-काश्मीरात एन्काउंटर:​​​​​​​कुलगामच्या खुदवानी परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कॉन्स्टेबलकडून AK-47 रायफल हिसकावली; मुनंदमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 जुलै रोजी दोन दहशतवादी ठार झाले होते

जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षादलावर निशाणा साधला आहे. कुलगामच्या खुदवानी परिसरांमध्ये दहशतवाद्यांनी पोलिस कॉन्सटेबलकडून AK-47 रायफल हिसकावली आहे. सुरक्षादलाने परिस्थिती हाताळली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. तर रविवारी मुनंद भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाली. यात सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला ठार मारले. आत्तापर्यंत त्याची ओळख पटली नाही.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला पोलिस आणि सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. परिसराला घेराव घालून शोध मोहीम राबवली जात आहे. या भागात आणखी अतिरेकी लपून बसलेले असू शकतात.

24 जुलै रोजी दोन दहशतवादी ठार झाले होते
शनिवारी पहाटे बांदीपोरा येथे सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीला सुरुवात झाली. या दरम्यान, सुंबलर परिसरातील शोकबाबा जंगलात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

गेल्या दोन दिवसांत 2 जवानही शहीद
तर 23 जुलैला सैन्याचा एक जवान शहीद झाला होता. भारतीय सैन्याच्या 16 कॉर्प्सनुसार शिपाईट कृष्ण वैद यांनी 23 जुलैला जम्मू-कश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये ऑपरेशनदरम्यान आपला जीव गमावला.
दुसरीकडे, 24 जुलैला पुंछ भागाच्या मनकोट सेक्टरमध्ये माइन ब्लास्टमुळे एक जवान शहीद झाला होता. ही घटना लाइन ऑफ कंट्रोल (LoC) जवळची असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...