आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Encounter Updates | 4 Terrorist Killed In Encounter In Jammu Kashmir Lakirpur Area Of Kulgam

जम्मू-काश्मीरमध्ये एन्काउंटर:श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, पहिल्यांदाच 4 महिन्यांत 4 दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांचा खात्मा

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयजी विजय कुमार यांनी सांगितले- दहशतवादी या घरात लपले होते
  • 4 महिन्यांत लश्कर, जैश, हिजबुल आणि अंसार गजवत-उल हिंदच्या प्रमुखांना ठार केले

रविवारी सकाळपासून जुनिमार भागात सुरु झालेली कारवाई संपली आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी एक घरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यातील दोघांची ओळख पटली असून भरथना (श्रीनगर) येथील शकूर फारूक लंगू आणि बिजबेहरा येथील शाहिद अहमद भट अशी यांची नावे आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटली नाही. हे सर्वजण हिजबुल मुजाहिदीन आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित होते. 

दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, या कारवाईसोबत इतिहासात पहिल्यांदाच 4 मुख्य संघटनांच्या प्रमुखांचा 4 महिन्यांत खात्मा झाला. जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, 4 महिन्यांत लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि अंसा गजवत-उल हिंदचे मुख्य लोक ठार झाले. 

दहशतवाद्यांना आत्मसमर्पणाचे आवाहन केले होते

आईजीने सांगितले की, श्रीनगरमध्ये ठार केलेले दहशतवादी स्थानिक दहशतवादी होते. कारवाई दरम्यान ते लपण्यासाठी एक घरात गेले होते. आम्ही इथल्या काही आदरणीय लोकांना म्हणालो की, तुम्ही या दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगा. परंतु दहशतवाद्यांनी त्यांचे न ऐकता ग्रेनेडद्वारे सुरक्षा दलांवर हल्ला केला. यानंतर झालेल्या चकमकीत त्यांना ठार केले. 

21 दिवसांता 12 एन्काउंटर

1 जून: नौशेरा भागात घुसखोरी करताना सुरक्षा दलांना 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले. 

2 जून: पुलवामाच्या त्राल भागात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

3 जून: पुलवामाच्या कंगन भागात सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. 

5 जून: राजौरी जिल्ह्यातील कालाकोटमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. 

7 जून: शोपियांच्या रेबन गावात 5 दहशतवाद्यांना ठार केले. 

8 जून: शोपियांच्या पिंजोरा भागात 4 दहशतवाद्यांचा खात्मा. 

10 जून: शोपियांच्या सुगू भागात 5 दहशतवाद्यांचा एन्काउंटर केला. 

13 जून: कुलगामच्या निपोरा भागात 2 दहशतवादी ठार झाले. 

16 जून: शोपियांच्या तुर्कवंगम गावात 3 दहशतवाद्यांचा खात्मा.

18-19 जून: अवंतीपोरा आणि शोपियांमध्ये 8 दहशतवाद्यांना ठार केले होते. 

21 जून: शोपियांमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. 

0