आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Encounter Updates । Pakistani Terrorist Killed In Forest Of Sopore, 3 Terrorists Surrounded By Security Forces

जम्मू-काश्मिरात एन्काउंटर:सोपोरमध्ये एका पाकिस्तानीसह लश्करचे 2 अतिरेकी ठार; कुपवाडातही चकमक सुरू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यातील जलुरा भागात लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यापैकी एक पाकिस्तानी आहे. जंगलात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. सोमवारी सायंकाळी ही चकमक सुरू झाली. दुसरीकडे कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव तुफैल आहे. हंजला असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. हा पाकिस्तानी दहशतवादी लाहोरचा रहिवासी होता. दहशतवाद्यांकडे जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून एक AK-47 रायफल आणि 5 मॅगझिन जप्त करण्यात आल्या आहेत.

10 दिवसांत टार्गेट किलिंगच्या 10 घटना

सध्या खोऱ्यात स्थलांतरित मजूर आणि काश्मिरी हिंदू हे दहशतवाद्यांचे लक्ष्य आहेत. 26 दिवसांत टार्गेट किलिंगच्या 10 घटनानंतर खोऱ्यातून स्थलांतर झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. टार्गेट किलिंगच्या सततच्या घटनांमुळे काश्मिरी हिंदूंमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की त्यांना केव्हाही, कुठेही गोळ्या घातल्या जाऊ शकतात.

दोन दिवसांपूर्वी हिजबुल कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील ऋषीपोरा भागात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमांडर निसार खांडे मारला गेल्याच्या दोन दिवसांनी ही चकमक झाली आहे. गेल्या काही महिन्यांत काश्मीरमध्ये अनेक दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये अनेक दहशतवादी आणि त्यांच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. विशेष गुप्त माहितीच्या आधारे बहुतेक ऑपरेशन्स पोलीस आणि लष्कराच्या माध्यमातून संयुक्तपणे पार पाडल्या गेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...