आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू काश्मीरच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई:बोगस शस्त्र परवाने तयार करणाऱ्यांची तब्बल 5 कोटींची संपत्ती जप्त, ईडीने 40 कोटींची अवैध संपत्तीही केली चिन्हांकित

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोगस शस्त्र परवाने तयार करणाऱ्या जम्मू काश्मिरातील अधिकाऱ्यांची तब्बल 5 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. हे अधिकारी केंद्रीय निमलष्करी दल किंवा लष्करी जवानांच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांना शस्त्र परवाने जारी करण्याचा गोरखधंदा करत होते. ईडीने या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 40 कोटींची संपत्तीही अवैध म्हणून चिन्हांकित केली आहे.

अवैध शस्त्र परवान्याच्या या व्यवहारात जम्मू काश्मीर प्रशासनातील अनेक विद्यमान व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा हात आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरू करण्यात आला होता. यात कुपवाडा जिल्ह्यातील तत्कालीन उपायुक्तांसह अनेक बडे अधिकारी आरोपी आहेत.

खोऱ्यातील अनेक अधिकारी या प्रकरणी नियम धाब्यावर बसवून दलालांच्या संगनमताने अवैध शस्त्र परवाणे जारी केले. या व्यवहारातून मिळणारी रक्कम त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या खात्यांत जमा केली. ईडीने या प्रकरणी गत आठवड्यात खोऱ्यातील वेगवेगळ्या 11 ठिकाणी छापेमारी केली. त्यात अडीच कोटींची रोख रक्कम व दागिण्यांसह अनेक संवेदनशील दस्तावेज जप्त करण्यात आलेत.

बातम्या आणखी आहेत...