आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू काश्मीरच्या 17 बंडखोर नेत्यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात माजी मुख्यमंत्री ताराचंद व माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पीरजादा मोहम्मद सईद यांचा समावेश आहे. या नेत्यांनी 2 महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटीक आझाद पार्टीत (DAP) प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल हजर होते.
के सी वेणुगोपाल या नेत्यांचे स्वगृही स्वागत करताना म्हणाले की, आज पक्षासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण 2 आठवड्यांनंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेपूर्वी हे नेते स्वगृही परतलेत. भारत जोडो यात्रा देशातील एक मोठे आंदोलन बनली आहे. त्यामुळे या सर्वच नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे.
अखंड भारताची इच्छा असणाऱ्या सर्व नेत्यांनी काँग्रेसमध्ये येतील
काँग्रेस नेते म्हणाले की, ही केवळ सुरुवात आहे. आता यात्रा जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे काँग्रेस विचारसरणीच्या व अखंड भारताची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच नेते व कार्यकर्ते पक्षात सहभागी होतील. माझ्या मते, हे नेते 2 महिन्यांच्या सुट्टीवर गेले होते. यावेळी त्यांना डीएपी प्रमुख गुलाम नबी आझाद यांच्याशी काँग्रेसमध्ये परतण्याविषयीची चर्चा सुरू आहे काय? असा प्रश्न केला असता त्यांनी आझाद यांनी स्वतःच ही गोष्ट फेटाळल्याचे स्पष्ट केले.
19 नेते पक्ष प्रवेश करणार होते
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, एकूण 19 नेत आज पक्षात प्रवेश करणार होते. पण 17 नेत्यांनाच दिल्लीत येऊन पक्ष प्रवेश करता आला. हा पहिला टप्पा आहे. इतर नेतेही लवकरच प्रवेश करतील. यावेळी ताराचंद म्हणाले - आम्ही मैत्री व भावनेच्या भरात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
यावेळी त्यांना तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये का परतलात? असा प्रश्न केला असता ते म्हणाले - माझ्या सारख्या गरीब व्यक्तीला काँग्रेसने उमेदवारी दिली. आमदार बनवले. सीएलपी नेतेपद दिले. त्यामुळे आम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये परतलोत. दुसरीकडे, पीरजादा म्हणाले की, मी 50 वर्षे काँग्रेसमध्ये राहिलो. वेगवेगळ्या पदांवर काम केले. 4 वेळा मंत्रीही राहिलो. माझ्याकडून चूक झाली. मी भावनेच्या भरात पक्ष सोडला. पण त्यानंतर मी 2 महिने मला झोप लागली नाही.
काँग्रेस विचारसरणीवर विश्वास असणाऱ्यांचे भारत जोडो यात्रेत स्वागत
यावेळी वेणुगोपाल यांना आझाद यांना भारत जोडो यात्रेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे काय? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर वेणुगोपाल म्हणाले - काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास असणाऱ्यांचे भारत जोडो यात्रेत स्वागत आहे. आ्ही समविचारी पक्षांना यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व महबुबा मुफ्ती यात्रेत सहभागी होतील. हे नेते श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.