आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. किश्तवाडमध्ये हा अपघात झाला. ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे लष्कराच्या वतीने सांगणत आले आहे. यात वैमानिकांना दुखापत झाली असली तरी ते सुरक्षित असल्याची माहिती देखील लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अरुणाचलमध्येही झाला होता अपघात
याआधी मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टरही कोसळले होते. मंडला टेकडी परिसरात भारतीय लष्कराचे एव्हिएशन चीता हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट शहीद झाले. अपघातानंतर भारतीय लष्कर, सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर ऑपरेशनल सॉर्टीवर होते. दरम्यान, त्याचा हवाई वाहतूक नियंत्रकाशी संपर्क तुटला. त्यानंतर बोमडिला पश्चिमेकडील मंडलाजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.