आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Latest News Update; Heroin Seized Worth Approximately Rs 135 Crore, Border Security Force (BSF)

जम्मू-काश्मीरात BSF ची मोठी कारवाई:हीरानगर सेक्टरमध्ये 135 कोटी रुपयांची 27 किलो हेरोइन जप्त, ड्रग तस्कर ठार

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 दिवसांपूर्वीच टेरर मॉड्यूलचा खुलासा झाला होता

जम्मू-काश्मीरमध्ये बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF)ला मोठे यश हाती लागले आहे. BSF ने येथून 27 किलो हेराइन जपत् केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हिरोइनची किंत 135 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. फोर्सने एका तस्करालाही ठार केले आहे.

3 दिवसांपूर्वीच टेरर मॉड्यूलचा खुलासा झाला होता

यापूर्वी, रविवारी बारामूला पोलिसांनी उरी परिसरात एका नार्को टेरर मॉड्यूलचा भांडाफोड केला होता. तसेच 6 संशयितांनाही ताब्यात घेतले होते. पकडलेले आरोपी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. काश्मीर पोलिसांनी सांगितल्यानुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 4 पिस्तुल, 10 ग्रेनेड, 21 लाख रुपये कॅश, 4 वाहने आणि 9 किलो हेरोइन जप्त करण्यात आली होती.

22 जूनला श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला

तिकडे, श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी एका CID इंस्पेक्टरची गोळ्या झाडून हत्या केली. घटना नौगाम परिसरात झाली. पोलिसांनी सांगितले की, नौगाम परिसरात दहशतवाद्यांनी इंस्पेक्टर परवेज अहमद डार यांच्यावर त्यांच्या घराजवळ तीन गोळ्या झाडल्या. त्यांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...