आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट:लश्कर-ए-तैयबा आर्मी पोस्टवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, 12 दहशतवाद्यांना ट्रेनिंग देऊन हल्ल्यासाठी तयार केल्याची माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीजी आणि पुंछ सेक्टरमधून घुसखोरीचा प्रयत्न होत आहे

जम्मू-काश्मीरमध्ये ठंडी सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. गुप्तचर संघटनांनी घाटीमध्ये सैन्याला अलर्ट केले आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तानची बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) ने भारतीय सैन्याच्या चौकींवर हल्ला करण्याचा कट रचला आहे. लश्कर-ए-तैयबाच्या 12 दहशतवाद्यांना ट्रेनिंग देऊन घुसखोरीसाठी तयार करण्यात आले आहे.

पुंछ आणि बीजी सेक्टरमधून घुसखोरीचा प्रयत्न

गुप्तचर संघटनांनी अलर्ट केले आहे की, राजौरी जिल्ह्यातील भिंभर गली (बीजी) सेक्टरमध्ये लश्कर सहा दहशतवाद्यांना एका गाईडच्या मदतीने भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच पुंछ सेक्टरमध्ये सहा दहशतवादी कमांडर अब्दुल फजलसोबत घुसखोरी करुन बॅटसारख्या घटना घडवण्याच्या प्रयत्नात आहे.

कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान चिडलेला आहे

सुरक्षा दलाचे म्हणने आहे की, काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनी सांगितल्यानुसार, एका सीनियर आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय सुरक्षा दलाचा पहारा चोख आहे आणि कोणालाही घुसखोरी करू दिली जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...