आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Murder Case; Carpenter Cuts Girlfriend's Body Into Pieces In Budgam

जम्मू-काश्मीरमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना:महिलेच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता श्रद्धासारखेच आणखी एक हत्या प्रकरण जम्मू-काश्मीरमध्ये समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबीर अहमद असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 45 वर्षे आहे. तो व्यवसायाने सुतार आहे. महिलेचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे अहमद आनंदी नव्हता.

महिला 7 मार्च रोजी बेपत्ता
7 मार्च रोजी ही महिला बेपत्ता झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अहमदला अटक करून चौकशी केली असता वास्तव समोर आले. पोलिसांनी अनेक ठिकाणाहून मृतदेहाचे तुकडे जप्त केले आहेत.

आरोपीला ताब्यात द्यावे, अशी मागणी आंदोलक महिला करत आहेत. (प्रतीकात्मक फोटो)
आरोपीला ताब्यात द्यावे, अशी मागणी आंदोलक महिला करत आहेत. (प्रतीकात्मक फोटो)

आरोपींच्या घराबाहेर निदर्शने
या 30 वर्षीय महिलेच्या हत्येनंतर शेकडो लोक आरोपीच्या घराबाहेर जमून निषेध करत आहेत. ते अहमदला फाशी देण्याची मागणी करत आहेत.

जम्मूमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, दोघेही डॉक्टर

जम्मूमध्ये महिला डॉक्टरची तिच्याच डॉक्टर प्रियकराने चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. खाजगी कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने फेसबूकवर पोस्ट शेअर करत सांगितले. ही पोस्ट पाहताच नातेवाकांनी पोलिसांना बोलावले. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...