आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Mass Suicide Updates । Six Family Member Found Dead At Home In Sidhra

जम्मूच्या सिधरामध्ये 6 जणांचा संशयास्पद मृत्यू:सामूहिक आत्महत्येची शंका, तपासासाठी पोलिसांनी स्थापन केली SIT

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मूच्या सिधरा भागात एकाच कुटुंबातील सहा जण त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये 4 पुरुष आणि दोन महिला आहेत. रिपोर्ट्सनुसार या सर्व जणांनी विष प्राशन केले आहे. गोळ्यांच्या खुणा आढळल्या नाहीत. मात्र, पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सर्व मृतदेह जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.

दोन घरांत आढळले 6 मृतदेह

मृतांमध्ये पाच मरमत डोडा आणि एक श्रीनगरमधील बरझुल्ला भागातील आहे. सकीना बेगम, त्यांच्या दोन मुली नसीमा अख्तर आणि रुबिना बानो, मुलगा जफर सलीम आणि दोन नातेवाईक नूर-उल-हबीब आणि साजाद अहमद अशी मृतांची नावे आहेत. दोन घरांतून मृतदेह सापडले आहेत.

जम्मू पोलिसांनी स्थापन केली SIT

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी संजय शर्मा (एसपी ग्रामीण), प्रदीप कुमार (एसडीपीओ नगरोटा), निरीक्षक विश्व प्रताप (एसएचओ नगरोटा) आणि एसआय माजिद हुसेन (आयसी पीपी सिधरा) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांना फोनवर मिळाली मृत्यूची बातमी

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री 9.45 वाजता कोणीतरी फोनवर माहिती दिली की, एका घरात काही लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पोलीस 10 वाजता घटनास्थळी पोहोचले. दुपारी एकच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...