आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir| Missing BJP Leader Found Hanging From Tree With Blood Marks; SIT Formed

जम्मू-काश्मिरात झाडाला लटकलेला आढळला भाजप नेत्याचा मृतदेह:सोमवारपसून बेपत्ता होते सोम राज; तपासासाठी SIT स्थापन

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात भाजप नेत्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. सोम राज असे मृत नेत्याचे नाव आहे. सोमवारपासून ते बेपत्ता होते. हिरानगर परिसरात मंगळवारी एका गावकऱ्याला त्यांचा मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या मृत्यूच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरावर रक्ताच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे. याशिवाय त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली होती. यानंतर हिरानगर पोलिसांनी आयपीसी कलम 174 अंतर्गत याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

कठुआचे एसएसपी आरसी कोतवाल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी ज्या नेत्यांवर आरोप केले आहेत, त्यांची चौकशी केली जाणार असून याप्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...