आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir News; Terrorists Attack Today In Srinagar District HMT Area Update; Army Jawan Martyred

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला:जिल्हा परिषद निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये सुरक्षादलावर हल्ला, 2 जवान शहीद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुंछमध्ये पाकिस्तानने केली फायरिंग

HMT परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. आज मुंबईच्या हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण झाले आणि याच दिवशी हल्ला करण्यात आला. जम्मू-कश्मीरमध्ये 2 दिवसांनंतर म्हणजेच 28 नोव्हेंबरपासून जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेत.

दहशतवाद्यांनी शरीफाबादमध्ये श्रीनगर-बारामूला हायवेवर एक पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला. सूत्रांनुसार, दहशतवाद्यांनी सलग पेट्रोलिंग पार्टीवर फायरिंग केली आणि यामध्ये दोन जवान गंभीर स्वरुपात जखमी झाले. नंतर त्यांनी प्राण सोडले.

पुंछमध्ये पाकिस्तानने केली फायरिंग
तिकडे, पाकिस्तानने पुन्हा एकदा लाइन ऑफ कंट्रोलवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पुंछ परिसरात LoC वर पाकिस्तान सतत फायरिंग करत आहे. भारतीय सैन्यही याचे उत्तर देत आहे. 4 दिवसांपूर्वीच पुंछच्या देगवार, माल्टी आणि दल्लान परिसरात पाकिस्तानने फायरिंग केली होती.

दोन घुसखोरीचे प्रयत्न झाले, 7 दहशतवादी ठार
आज झालेल्या हल्ल्याच्या 7 दिवसांपूर्वी नगरोटामध्ये सैन्य आणइ सुरक्षादलाने जैशच्या 4 दहशतवाद्यांना ठार केले होते. जम्मू-कश्मीर पोलिसांनी म्हटले होते की, हे दहशतवादी निवडणुकांपूर्वी मोठा हल्ला करण्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानमध्ये बसलेला मसूद अजहरचा भाऊ रऊफ लाला यांचा हँडलर होता.

यापूर्वीही 8 नोव्हेंबरला कुपवाडामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. सैन्य आणि बॉर्डर सिक्योरिटी फोर्सने जॉइंट ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केले होते. चकमकीमध्ये सैन्याच्या कॅप्टनसह 3 जवानही शहीद झाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser