आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अनंतनाग, श्रीनगरसह जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात छापेमारी केली आहे. ही छापेमारी दहशतवाद्यांच्या फंडिंग प्रकरणी केल्याचे सांगितले जात आहे. घाटीतील या दहशतवाद्यांना हा वित्त पुरवठा इसिसकडून तर होत नाही ना? याचा शोध घेण्याकरीता राष्ट्रीय तपास यंत्रणा कामाला लागलेली आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अनंतनागमधील 4 तर श्रीनगरमधील एका जागेवार ही छापेमारी सुरु आहे. संबंधित प्रकरणात आतापर्यंत 5 लोकांना अटक करण्यात आली असून ज्यामध्ये 36 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणात आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमध्ये एनआयएसोबत जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफचा समावेश आहे.
महिलेकडून चिनी ग्रेनेड जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने अनंतनागसह बारामुल्ला आणि श्रीनगरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये एका महिलेला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चीनी ग्रेनेड आणि 48 हजार रोख जमा करण्यात आली आहे.
हाका बाजारातून एकाला अटक
सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएने रविवारी सकाळी दारुल उलूम, दलाल मोहल्ला, नवाबाजार येथे पोलिस, एसओजी, एसडीपीओच्या अनेक अधिकाऱ्यांसमवेत छापेमारी केली. दरम्यान, एनआयएने काही कार्यालयाच्या नोंदी, एक लॅपटॉप जप्त केले. त्यासोबतच अदनान अहमद नदवीला अटक केली.
11 सरकारी कर्मचारी बडतर्फ
जम्मू-काश्मीर प्रशासनाने यापूर्वी दहशतवादी संघटनांना मदत पोहोचवण्याच्या आरोपाखाली मुजाहिद्दीनचे प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांचे दोन पुत्र आणि 11 पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी शिक्षण, पोलिस, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा, आरोग्य विभाग आणि SKIMS (शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) चे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.