आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांनी पुलवामात झालेल्या हल्ल्यासारखाच आणखी एक हल्ला करण्याचा जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचा कट गुरुवारी उधळून लावला. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाईदरम्यान हल्लेखोर पळून गेला. मात्र, त्याने त्या जागी सोडलेली कार सापडली. यात एका ड्रममध्ये आयईडी ठेवला होता.
माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसर रिकामा केला. नंतर ही कार नष्ट करण्यात आली. या कटात केंद्रीय राखीव दलाच्या ४०० जवानांना लक्ष्य केले होते. या जवानांचा २० गाड्यांचा ताफा गुरुवारी श्रीनगरहून जम्मूला पोहोचला. गुरुवारी हा ताफा सकाळी ७ वाजता निघणार होतो. यात सर्व दर्जाचे अधिकारी, जवान होते. हा ताफाच दहशतवाद्यांचे लक्ष्य होते.
४० किलो स्फोटके :
जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक विजयकुमार यांनी सांगितले, दहशतवादी या सुरक्षा दलांच्या ताफ्याला उडवू पाहत होते. या कारमध्ये २५ किलो स्फोटके आहेत, असा अंदाज होता.
रात्रीच आला होता दहशतवादी... :
माहिती मिळताच सुरक्षा दलांनी नाकेबंदी केली होती. पोलिसांनी या हल्लेखाेराच्या कारला अडवले. परंतु तो थांबला नाही. पोलिसांनी गोळीबार केला तेव्हा तो पळून गेला. दुसऱ्या नाक्यावरही अडवले तेव्हा हल्लेखोर कार सोडून पळून गेला.
पाकमध्येच रचला कट :
तपासात आढळून आले आहे की, पांढऱ्या रंगाच्या सँट्रो कारची नोंदणी दुचाकीच्या नंबरवर होती. या क्रमांकाच्या वाहनाचा मालक कठुआमध्ये राहतो. आदिल नावाचा दहशतवादी कार चालवत होता. सोबत इतर काही दहशतवादीही हाेते. पुलवामामध्ये ज्या दहशतवाद्याने सुरक्षा दलांवर हल्ला केला होता त्याचे नावही योगायोगाने आदिल असेच होते. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.