आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर पोलिस भरती घोटाळा:4 जणांना अटक, पीएसआयसह हवालदाराचा समावेश

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीर खोऱ्यात पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी चार जणांना अटक केली. यामध्ये जम्मू-काश्मिरातील एक सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि सीआरपीएफ हवालदाराचा समावेश आहे. जम्मू-काश्मिरातील या परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटली होती.

एएसआय अशोककुमार, सीआरपीएफ हवालदार सुरेंदरसिंग, प्रिंटिंग प्रेस पॅकिंग इन्चार्ज प्रदीपकुमार आणि बाजिंदरसिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी २० ते ३० लाख रुपये दिल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसचे दोन हवालदार, एक सीआरपीएफ अधिकारी, बीएसएफचा एक कमांडंट, एका शिक्षकाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...