आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-कश्मीरमधील शोपियातील मुनिहालमध्ये भारतीय सुरक्षा दलाने सोमवारी चार दहशतवाद्यांला ठार केले. यामधील दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून ते लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित आहे. परंतु, इतर दोन दहशतवाद्यांची ओळख आतापर्यंत पटलेली नाही. सुरक्षा दलाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली होती. या झालेल्या कारवाईत अजून दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता सुरक्षा दलाकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सुरक्षा दलाकडून शोधकार्य अद्यापही सुरुच आहे.
गेल्या आठवड्यातच शोपियामधील रावरपोरामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या सज्जाद अफगाणीला सुरक्षा दलाने ठार केले होते. तीन दिवस चाललेल्या या एन्काउंटरमध्ये भारतीय सुरक्षा दलाने सज्जाद अफगाणीसोबतच कित्येक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सज्जाद अफगाणीवर तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती करण्याचे आरोप होते.
दुसरा दहशतवादी 'लष्कर-ए-तोयबा'सोबत जुडलेला
रविवारी झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार झालेला जहांगीर अहमद हा 'लष्कर-ए-तोयबा' या संघटनेशी संबंधित होता. तो शोपियामधील राख नारापोरा येथील रहिवाशी असून गेल्या सप्टेंबरपासून दहशतवादी संघटनासोबत सक्रीय होता.
दहशतवाद्यांनी सोपोरमधील पोलिस चौकीवर हल्ला केला होता
दहशतवाद्यांनी यापूर्वी सोपोरमधील पोलिस चौकीवर शनिवारी ग्रेनेडने हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचा निशाणा चुकल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु, यामध्ये दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.
दोन आठवड्यापूर्वी दोन दहशतवादी मारले गेले होते
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या 11 मार्च रोजी झालेल्या चकमकीत जैशचे दोन दहशतवादी ठार झाले होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एके-47, रायफल, ग्रेनेड आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. उत्तर कश्मीरमधील बारामुल्ला जिल्हातील सोपोरमध्ये सुरक्षा दलाने 9 मार्च रोजी झालेल्या चकमकीत अल-ब्रदच्या प्रमुखाला ठार केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.