आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मिर:श्रीनगरमध्ये ‘हिजबुल’च्या तीन, तर शोपियांत एका अतिरेक्यास कंठस्नान, सोपोरमध्ये तोयबाशी संबंधित तिघे अटकेत

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मिरातील श्रीनगर आणि शोपियांत रविवारी चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार मारले आणि सोपोरमध्ये लष्कर-ए-तोयबाशी संबंधित तीन जणांना अटक केली. श्रीनगरच्या जुनीमारमधील पोजलवार भागात ३ आणि शोपियांत एका दहशतवाद्याला ठार केले. त्यांच्याकडून एके-४७ रायफल, दोन पिस्तुलांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोजवालपोरामध्ये एका घरात दहशतवादी लपले असल्याच्या माहितीवरून सकाळी सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली. हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटल्यावर त्यांच्या आई- वडिलांना बोलावून शरण आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र दहशतवाद्यांनी नकार दिला. अडीच तासांनंतर सुरक्षा दल पुढे जाऊ लागल्याने दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल कारवाईत दहशतवादी मारले गेले. यातील एक दहशतवादी गेल्या महिन्यात बीएसएफच्या दोन जवानांच्या झालेल्या हत्येत सहभागी होता.

चार दहशतवादी संघटनांचे प्रमुख मारले गेले

काश्मीरचे आयजीपी विजयकुमार यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांत दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत चार प्रमुख दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहंमद, हिजबुल मुजाहिदीन आणि अन्सार गजवत उल हिंदचे प्रमुख मारले गेले आहेत. या वर्षी आतापर्यंत १०६ दहशतवादी मारले गेले. १०० ते २०० दहशतवादी अजूनही सक्रिय आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काश्मीर खोऱ्यात २५२ दहशतवादी सक्रिय होते. विजयकुमार यांनी सांगितले की, शनिवारी कुलगाममध्ये जैश ए मोहंमदचा दहशतवादी मारला होता. त्याच्याकडून अमेरिकी एम- ४ बंदूक जप्त करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...