आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला:शाळेत घुसून मुख्याध्यापक आणि शिक्षकाची हत्या; 5 दिवसांत 7 व्यांदा सामान्य नागरिकांवर हल्ला

श्रीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र

जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी ईदगाह परिसरातील शासकीय बॉईज उच्च माध्यमिक शाळेत घुसून गोळीबार केला आहे. यामध्ये मुख्याध्यापक सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांचा मृत्यू झाला. सतींदर कौर शीख समाजातील होत्या आणि दीपक चंद काश्मिरी पंडित होते. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. घाटीमध्ये गेल्या 5 दिवसात सामान्य नागरिकांच्या हत्येची ही 7 वी घटना आहे, त्यापैकी 6 फक्त श्रीनगरमधील आहेत.

स्थानिक मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र
जम्मू -काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दैनिक भास्करला सांगितले की, स्थानिक मुस्लिमांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. काश्मीरमधील जातीय सलोखा नष्ट करण्याच्या षडयंत्राचा एक भाग म्हणून निःशस्त्र नागरिकांची हत्या केली जात आहे. हे दहशतवाद्यांची निराशा आणि क्रूरता स्पष्टपणे दर्शवते. दहशतवाद्यांना काश्मीरमधील शांतता आणि बंधुता संपवायची आहे, पण आम्ही त्यांच्या योजना यशस्वी होऊ देणार नाही.

ते म्हणाले की आम्हाला मागील घटनांबद्दल काही संकेत मिळाले आहेत आणि आम्ही या नवीन प्रकरणाचीही चौकशी करू. आम्ही शाळेच्या इतर शिक्षकांशी बोललो आणि ते त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मृत्यूवर विश्वास ठेवू शकत नाहीयेत. पोलिस लवकरच त्यांच्या मारेकऱ्यांना शोधतील.

गेल्या 5 दिवसात 7 वी घटना

मंगळवारी दहशतवद्यांनी 3 नागरिकांचा घेतला बळी
पहिली घटना:
दहशतवाद्यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास इकबाल पार्क परिसरातील श्रीनगरचे प्रसिद्ध फार्मासिस्ट मखनलाल बिंद्रू (68) यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी मेडिकल स्टोअरमध्ये घुसून त्यांना गोळ्या घातल्या. बुधवारी त्यांची मुलगी डॉ श्रद्धा बिंद्रू यांनी दहशतवाद्यांना वादविवादाचे आव्हान दिले होते.

दुसरी घटना: मंगळवारी रात्री साडेआठ वाजता लाल बाजार परिसरात दहशतवाद्यांनी वीरेंद्र पासवान यांची हत्या केली. तो पाणीपुरीचा व्यवसाय करायचा. तो बिहारमधील भागलपूरचा रहिवासी होता.

तिसरी घटना: मंगळवारीच 8:45 वाजता बांदीपोराच्या शाहगुंड परिसरात दहशतवाद्यांनी एका नागरिकाची हत्या केली. मोहम्मद शफी लोणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तो नायदखाईचा रहिवासी होता.

5 दिवसांपूर्वी 2 लोकांची केली हत्या
यापूर्वी शनिवारी श्रीनगरमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. पहिली घटना कारा नगर परिसरात घडली. येथे दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिक अब्दुर रहमान गुरूला गोळ्या घातल्या. तो श्रीनगरमधील चट्टाबलच्या गालवांटेंग परिसरातील रहिवासी होता. शनिवारीच दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या एसडी कॉलनी बटामालूमध्ये एका नागरिकाला गोळ्या घातल्या, ज्याचा एसएमएचएस रुग्णालयात मृत्यू झाला. मोहम्मद शफी दार असे मृताचे नाव आहे.

दहशतवाद्यांनी या वर्षी 25 नागरिकांचा बळी घेतला
या वर्षी जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 25 नागरिकांची हत्या केली. यामध्ये श्रीनगरमध्ये 10, पुलवामामध्ये 4, अनंतनागमध्ये 4, कुलगाममध्ये 3, बारामुल्लामध्ये 2, बडगाममध्ये 1 आणि बांदीपोरामध्ये 1 नागरिक ठार झाले.

बातम्या आणखी आहेत...