आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir : Terrorist Attack On CRPF And Police, Three CRPF Personnel Killed In Terrorist Attack In North Kashmir's Sopore Town

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:बारामुल्लात पोलिस आणि सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद तर 3 जखमी

बारामुल्लाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ - फाइल फोटो - Divya Marathi
काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ - फाइल फोटो
  • कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवायांत वाढ

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात शनिवारी सायंकाळी मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त नाक्याला निशाणा बनवले. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका आठवड्यात तिसर्‍यांदा दहशतवाद्यांनी सैनिकांना लक्ष्य केले आहे. हल्ल्यानंतर सैन्याने संपूर्ण परिसर सील केला आहे. घटनेशी संबंधित अन्य माहिती अद्याप येणे बाकी आहे.

काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानकडूनही सीमेपलिकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. शुक्रवारी देखील अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता. याशिवाय शुक्रवारीच दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या. यामध्ये सैनिकांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. 

गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी एसपीओची केली होती हत्या 

मागील आठवड्यात किश्तवाड जिल्हयात दहशतवाद्यांनी एक विशेष पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. या दरम्यान अन्य पोलिस अधिकारी जखमी झाला होता. शुक्रवारी या घटनेतील दोन आरोपींनाही पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.

बातम्या आणखी आहेत...