आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Terrorist Attack; Firing In Rajouri | Pulwama | News Year | Jammu Kashmir

काश्मीरात जिथे 4 हिंदू मारले, तिथे आज पुन्हा स्फोट:मुलगी ठार; धांगरीत IED ब्लास्ट; ID पाहून दहशतवाद्यांनी केल्या हत्या

श्रीनगर | रउफ डारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारानंतर आज सोमवारी सकाळी पहाटे पुन्हा आयईडी स्फोट झाला आहे. राजौरीतील धांगरीत झालेल्या स्फोटात 2 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रविवारी याच गावात दहशतवाद्यांनी तीन घरांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 4 हिंदू लोक मारले गेले होते. सोमवारी सकाळी या हल्ल्याचा निषेध करत असतानाच आणखी एका स्फोट करण्यात आला.

स्थानिकांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी लोकांना घराबाहेर बोलावले. त्यांचे आधार कार्ड पाहिले आणि नंतर गोळीबार सुरू केला. ADGP मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार शोध मोहीम सुरू आहे. पोलीस, सीआरपीएफ, लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

स्फोटानंतर लष्कराच्या जवानाने एका गंभीर झालेल्या मुलीला उपचारासाठी नेतानाच फोटो
स्फोटानंतर लष्कराच्या जवानाने एका गंभीर झालेल्या मुलीला उपचारासाठी नेतानाच फोटो

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तीन घटना

  • नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवादी घटना घडल्या आहेत. रविवारी रात्री उशीरा राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. ज्यामध्ये मृतांची संख्या 4 वर गेली आहे. तर 5 जण जखमी झालेले आहेत.
  • एडीजीपी मुकेशसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 दहशतवाद्यांनी 3 घरांना लक्ष्य केले होते.
  • तत्पूर्वी या घटनेची रविवारी सायंकाळच्या वेळेला श्रीनगरच्या हवाल चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 28 व्या बटालियनच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला केला. यात एक नागरिक जखमी झाला.
  • याशिवाय, पुलवामाच्या राजपोरा भागात सीआरपीएफ जवानाकडून एके-47 हिसकावून घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

पहिली घटना : राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लोकांवर गोळीबार केला

राजौरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राजौरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजौरीच्या डांगरी भागात दहशतवाद्यांनी रविवारी सायंकाळी 6-7 वाजेच्या सुमारास गावातील लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राजौरी येथील असोसिएटेड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहमूद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राजौरीतील डांगरी भागात झालेल्या गोळीबारात तीघांचा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 9 जण जखमी आहेत.

मृतांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात ओक्साबोक्सी रडत होते.
मृतांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात ओक्साबोक्सी रडत होते.

लोकांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी दहशतवादी आले आणि त्यांनी लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. ते सर्वांचे आधार कार्ड पाहत होते. यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सतीश कुमार (45), प्रीतम लाल (56), शिवपाल (32) यांचा मृत्यू झाला. चौथ्या मृताचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

दुसरी घटना: श्रीनगरमध्ये CRPF बंकरवर ग्रेनेड हल्ला

श्रीनगरच्या गजबजलेल्या भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला.
श्रीनगरच्या गजबजलेल्या भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला.

दुसरी दहशतवादी घटना श्रीनगरमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. येथील हवाल चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 28 व्या बटालियनच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात जवानांना कोणतीही हाणी झाली नसली तरी समीर अहमद मल्ला हा स्थानिक नागरिक जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमीचा फोटो अद्याप समोर आलेला नाही.

तिसरी घटना : पुलवामामध्ये जवानाकडून रायफल हिसकावण्यात आली
तत्पूर्वी रविवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात एका सीआरपीएफ जवानाकडून एके-47 रायफल हिसकावल्याची घटना समोर आली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला.

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाची रायफल हिसकावून घेतल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली.
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाची रायफल हिसकावून घेतल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली.

मात्र, सायंकाळपर्यंत रायफल हिसकावणाऱ्या तरुणाला त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात नेऊन शस्त्र परत केले. रायफल हिसकावणाऱ्या तरुणाचे इरफान बशीर गनी असे नाव आहे. तो 25 वर्षांचा आहे. दहशतवाद्यांनी 183 बटालियनच्या जवानाकडून एके-47 रायफल हिसकावून घेतली होती. सीआरपीएफकडून रायफल हिसकावण्याचे कारण त्याने अद्याप स्पष्ट केले नाही.

2022 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाच्या 93 चकमक झाल्या. ज्यामध्ये 172 दहशतवादी मारले गेले. त्यापैकी 42 परदेशी होते. त्याचवेळी, दहशतवाद्यांनी यावर्षी 29 नागरिकांची हत्या केली, त्यापैकी 3 काश्मिरी पंडितांसह 6 हिंदू होते. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये सर्वाधिक 108 दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्याशी संबंधित संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट'चे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...