आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्हात भारतीय सुरक्षा दल आणि दहशवादी दरम्यान झालेल्या चकमकीत तीन दहशवाद्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली असून यात स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दलांना येथे दहशतवादी लपून बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी हा परिसर घेरुन यामध्ये शोधमोहिम सुरु केली. दरम्यान, दशवाद्यांकडून सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु झाला. प्रत्युत्तर देतांना सुरक्षा दलांकडून तीन दशवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, येथे सध्या शोधमोहिम सुरु असून गेल्या तीन दिवसांत 11 दशवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे.
दोन दिवसांपूर्वी शोपियांमध्ये एन्काऊंटर
यापूर्वी शोपियांमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलाने मशिदीत लपलेल्या पाच दहशतवाद्यांना ठार केले होते. दरम्यान, दहशतवाद्यांना प्रथम शरण जाण्यास सांगितले होते. त्यांना समजवण्यासाठी मशिदीत त्यांच्या भाऊला आणि एका इमामला पाठवण्यात आले होते. परंतु, त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. परिणामी सुरक्षा दलाने कित्येक तासांच्या प्रयत्नानंतर पाच दहशतवाद्यांना ठार केले.
सुरक्षा दलाने मशिद वाचवण्यासाठी एन्काऊंटर रोखले होते
जम्मू-कश्मीर पोलिसांचे आयजी म्हणाले की, दहशवाद्यांकडून सतत गोळीबार सुरु होता. परंतु, आम्हाला मशिदीचे नासधूस नको होते. त्यामुळे बराच वेळ एन्काऊंटर बंद होता. दशवाद्यांनी हे मान्य न केल्याने ऑपरेशन पुन्हा सुरु करण्यात आले. दरम्यान, यामध्ये तीन दशवाद्यांचा मृत्यू झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.