आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Terrorists Encounter Operation; Lashkar E Taiba Terrorists By Indian Army In Rajouri

काश्मीरात घुसखोरांचे एन्काउंटर:प्रतिक्षा करा आणि संधी मिळताच मारा, दहशतवाद्यांसाठी सैन्याची नवीन रणनिती; आतापर्यंत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामान्य नागरिकांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राजौरीच्या जंगलात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कराने आतापर्यंत लष्कर-ए-तोयबाच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आताही 3 ते 4 दहशतवादी तिथे लपल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन रणनिती आखली आहे. या अंतर्गत, थांबा, दहशतवाद्यांना गावापर्यंत येऊ द्या, मग त्यांचा खात्मा करण्याचे धोरण राबवले जात आहे. गेल्या काही महिन्यांत लष्करचे 9 ते 10 दहशतवादी पाकिस्तानातून राजौरी-पुंछ जिल्ह्याच्या जंगलात शिरले होते. याशिवाय, घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले, पण लष्कराने त्यांना उधळून लावले.

या जंगलांमध्ये शहीद झाले 9 सैनिक
राजौरीच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 9 जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांनी 16 ऑक्टोबर रोजी या भागाला भेट दिली होती. दहशतवादविरोधी कारवाया हाताळणाऱ्या कमांडर्सशी त्यांनी चर्चा केली होती.

त्यांनी सैनिकांना दहशतवाद्यांना को प्रो-अॅक्टिव्हली इंगेज करण्याऐवजी त्यांच्या हालचालींची वाट पाहण्यास सांगितले. लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दहशतवादी प्रत्येकी दोन तुकड्यांमध्ये फिरले. यामुळे त्यांना त्यांचे स्थान सतत बदलण्यास मदत झाली आणि भारतीय लष्कराच्या अधिक सैनिकांना इजा झाली. भारतीय लष्कराचे जवान दहशतवाद्यांच्या शोधात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

दहशतवाद्यांना गावापर्यंत येऊ द्या, मग लक्ष्य करा
एका कमांडरने सांगितले की, दहशतवाद्यांना खेड्यापाड्यात खाण्यापिण्यासाठी येऊ द्या, मग त्यांना लक्ष्य करा. जंगलात लढण्यासाठी संयम आवश्यक आहे. सैनिकांना सतर्क राहण्यास आणि दहशतवाद्यांना समोरासमोर गुंतवून जीवितहानी टाळण्यास सांगितले आहे. वेळेचा काही प्रश्न नाही. यामुळे आपण दहशतवाद्यांना दमवू आणि नंतर त्यांचा खात्मा करू.

श्रीनगरमध्ये जवान येणाऱ्या-जाणाऱ्यांची झडती घेत आहेत.
श्रीनगरमध्ये जवान येणाऱ्या-जाणाऱ्यांची झडती घेत आहेत.

आजूबाजूच्या लोकांची चौकशी
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी तीन लोकांची चौकशी केली आहे. त्यापैकी एक 45 वर्षीय महिला आहे. एजन्सी तिची चौकशी करत आहेत. तिने चकमकीत सहभागी दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट दिल्याचा संशय आहे. जरीना अख्तर आणि शफैत अशी या महिलेचे आणि तिच्या मुलाचे नाव आहे.

सामान्य नागरिकांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात, विशेषत: राजधानी श्रीनगरमध्ये शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या टार्गेट किलिंगमध्ये आतापर्यंत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरमधील काही भागांमध्ये अधिकाऱ्यांनी मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...