आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jammu & Kashmir : Terrorists Killed In Encounter Sunil Kale Of Solapur Martyr While Fighting Terrorists

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीरमरण:पहाटे झालेल्या चकमकीत पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, मात्र सोलापूरचे जवान सुनील काळेंना वीरमरण

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षादलाला पुलवामाच्या बंदजू परिसरात जवळपास 5 दहशतवादी लपले असल्याची सूचना मिळाली होती.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान येथे दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले आहे. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे CRPF जवान  सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले.

न्यूज एजेंसीनुसार, सुरक्षादलाला पुलवामाच्या बंदजू परिसरात जवळपास 5 दहशतवादी लपले असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर पोलीस आणि सीआरपीएफने या परिसरात शोध मोहिम सुरू केली. दरम्यान दरशतवाद्यांनी फायरिंग करण्यास सुरूवात केली.

दरम्यान दहशतवाद्यांशी दोन हात करताना सोलापूर जिल्ह्यातील सुनील काळे हे धारातिर्थी पडले.  सुनिल काळे हे आज  पहाटे 4.30 वाजता झालेल्या चकमकीत  शहीद झाले. सुनिल काळे यांच्या शहीद होण्याच्या वृत्तानंतर गावावर शोककळा पसरली आहे. तर काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

नुकतीच मिळाली होती हेड काँस्टेबल पदी बढती

दहशतवाद्यांशी आपल्या जीवाची परवा न करणारे सुनील काळे गेल्या 17 वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दालत काम करत होते. नुकतेच त्यांना हेड काँस्टेबल या पदावर बढती मिळाली होती. दोन भाऊ आणि एका बहीणीत ते मधले बंधू होते. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी जानेवारी महिन्यातच गावी येऊन कुटुंबियांची भेट घेतली होती. यानंतर ते पुन्हा ड्युटीवर परतले. याच महिन्यात पुन्हा सुटी घेऊन गावी येण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु, कोरोना असल्याने ते घरी येऊ शकले नाही.

वर्षभरात निवृत्ती घेऊन घरी येणार होते

सुनील काळे गावात अतिशय मनमिळावू आणि मितभाषी होती. नेहमीच लोकांसाठी धडपड करणारे सुनील काळे यापूर्वी गावी आले तेव्हा त्यांनी पाणी फाउंडेशनसाठी काम देखील केले होते. सुनील काळे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, येत्या वर्षभरात त्यांची सीआरपीएफमधून निवृत्त होणार होती. यासाठी त्यांनी गावात राहण्याचे नियोजन केले होते. नेहमीच भाऊ, आई आणि पत्नीसोबत या विषयावर चर्चा व्हायची. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या भावाशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी भावाने गावात एक बोअरवेल खोदल्याचा फोटो त्यांना पाठवला होता. यावर सुनील खूप खुश होते असे त्यांच्या बंधूंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...